(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
बॉलिवूड अभिनेता वरुण धवन सध्या आपल्या मुलीबद्दल बोलताना दिसत आहे. अलीकडेच वरुण धवनने अमिताभ बच्चन यांच्या ‘कौन बनेगा करोडपती’ या शोमध्ये आपल्या मुलीच्या नावाचा खुलासा केला होता. त्याने आपल्या मुलीचे नाव ‘लारा’ ठेवले आहे. याशिवाय आता अभिनेत्याने दिलेले वक्तव्यही खूप व्हायरल होत आहे. तसेच वरुण धवनने आपल्या मुलीबाबत आणखी एक वक्तव्य शेअर केले आहे.
वडील झाल्यानंतर वरुण धवनमध्ये झाले बदल
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत वरुणने पालक झाल्यानंतर त्याच्यामध्ये काय बदल झाले हे सांगितले आहे. या अभिनेत्याने खुलासा केला आहे की लाराच्या जन्मानंतर तो खूप संरक्षणात्मक झाला आहे. वरुण म्हणाला, ‘मला वाटतं जेव्हा कोणतीही व्यक्ती, कोणताही पुरुष वडील बनतो तेव्हा आईसाठी हा एक वेगळा अनुभव असतो, मला वाटतं ती एक शक्तिशाली महिला बनते, त्या क्षणी असं काहीतरी घडतं. पण एक माणूस म्हणून बोलताना, जेव्हा आपण वडील बनतो, तेव्हा काही कारणास्तव आपल्याला आपल्या मुलीबद्दल संरक्षण वाटते.’ असे अभिनेत्याने सांगितले आहे.
हे देखील वाचा- Kangana Ranaut: कंगना रणौतच्या कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर, अभिनेत्रीच्या आजीचे झाले निधन!
वरुण आपल्या मुलीला त्रास देणाऱ्या कोणालाही सोडणार नाही
वरुण धवनने आपल्या विधानाचा शेवट असे सांगून केला की, ‘मला खात्री आहे की तुम्हालाही मुलांसाठी असेच वाटते, परंतु मुलीसाठी, जर कोणी तिचे (थोडेसेही) नुकसान केले तर मी त्याला ठार करीन. हे सांगताना मी खूप गंभीर होतो. खरंच, मी त्याला मारून टाकीन.’ असं अभिनेता म्हणाल आहे. लारामुळे वरुण धवन आता त्याच्या वडिलांसोबतही पूर्वीपेक्षा चांगले वागू लागला आहे.
हे देखील वाचा- “माझं नाव, परिचय सांगितला आणि…” प्रसिद्ध खलनायकाच्या नातवाने लिहिले खास आजोबांसाठी पत्र, जुन्या आठवणींत नातू भावुक…
वडिलांबद्दलही वरुणच्या भावना बदलल्या
वरुण म्हणाला, ‘मी माझ्या वडिलांना, त्यांची असुरक्षितता, त्यांची उच्च वागणूक, वेळेवर घरी येण्याची त्यांची चिंता अधिक चांगल्या प्रकारे समजून घेऊ लागलो आहे. ते माझ्या आईला हाक मारतात, त्यांना फक्त सर्व कुटूंब एकत्र हवे असते. हे मला कधीच समजू शकले नाही. मला प्रश्न पडला की त्यांची समस्या काय आहे? मी लहान मुलगा नाही आहे, मला कशाला ठेवायचे आहे त्यांच्यासोबत? पण आता मला मूल झाले आहे, मी स्वतः एका मुलीचा बाप झालो आज तर मला हे सगळं समजले आहे.’ असे वरुणने सांगितले.