(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
बॉलीवूड अभिनेता वरुण धवन सध्या त्याच्या आगामी चित्रपट ‘सनी संस्कारी की तुलसी कुमारी’ च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात त्याने आणि जाह्नवी कपूरने मुख्य भूमिका साकारली आहे आणि त्याशिवाय सान्या मल्होत्रा आणि रोहित सर्राफ यांचाही समावेश आहे. ट्रेलर व गाणी अगोदरच प्रसिद्ध झालेली असून प्रेक्षकांना चांगली पसंती मिळत आहेत. हा चित्रपट २ ऑक्टोबरला दसऱ्याच्या दिवशी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.
प्रमोशनच्या गडबडीत बॉलीवूड अभिनेता वरुण धवन याने दुर्गाष्टमीच्या दिवशी आपल्या घरी कन्या पूजन आयोजित केले होते. यावेळी त्याने अनेक लहान मुलींना आणि एक छोट्या मुलालाही आमंत्रित केले होते. या कन्या पूजेचे फोटो त्याने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले आहेत, जी सध्या व्हायरल होत आहेत. ज्यामुळे चाहते आणि फॉलोअर्समध्ये उत्सुकता वाढली आहे.
Jaya Bachchan: हसणाऱ्या जयाजींचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल, नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स
फोटोमध्ये वरुण धवन लहान मुला-मुलींसोबत जमिनीवर बसून पूरी, भाजी, खीर आणि हलवा यांसारख्या पारंपरिक पदार्थांचा आस्वाद घेताना दिसतोय. त्याच्यासोबत बसलेल्या मुलींनी पारंपरिक पोशाख घातले असून चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहतोय. वरुणचा हा सोहळा पाहून चाहत्यांनी त्याचे कौतुक केलं असून, अनेकांनी कमेंट्समध्ये लिहिलं आहे की, “खऱ्या अर्थाने संस्कारी सनी!” तर वरूणने शेअर केलेल्या फोटोंमध्ये तो लहान मुलींमध्ये बसून साधेपणाने जेवत आहे. पण त्याच्या ताटाने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. तर लहान मुलांना पेपर प्लेटमध्ये जेवण दिले गेले होते. यावर काही युजर्सने प्रश्न उपस्थित करत नाराजी व्यक्त केली.एका युजरने लिहिले, “सर, स्वत:साठी स्टीलची थाळी आणि मुलांसाठी डिस्पोजेबल प्लेट? अस म्हणत काहींना नाराजी व्यक्त केली असून काहींनी त्याचे कौतुक ही केलं आहे.
वरुण धवन नुकताच ‘बेबी जॉन’ मध्ये दिसला होता. आता त्याचा आगामी चित्रपट ‘सनी संस्कारी की तुलसी कुमारी’ २ ऑक्टोबरला रिलीज होणार आहे. या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर ऋषभ शेट्टीच्या ‘कांतारा: चैप्टर 1’ सोबत टक्कर आहे, ज्याला प्रेक्षकांची खूप अपेक्षा आहे.याशिवाय वरुण पुढील प्रोजेक्ट्समध्ये ‘है जवानी तो इश्क होना है’ आणि ‘बॉर्डर 2’ मध्येही दिसणार आहे.