फोटो सौजन्य - Social Media
बिप्लब दासगुप्ता बंगाली सिनेविश्वातील महत्वाचा चेहरा मानला जातो, तसेच त्यांनी 17 हून अधिकी बंगाली भाषी मालिकांमध्ये आपले अभिनय कौशल्य सादर केले आहे. दरम्यान, त्यांच्या जाण्याने बंगाली TV क्षेत्रालाही मोठा फटका बसला आहे. Biplab Dasgupta यांनी ‘केमिस्ट्री मासी’, ‘चेकमेट’ आणि ‘जगमाया’ यांसारख्या अनेक TV मालिकांमध्ये काम केले आहे.
अभिनेता होण्याअगोदर होते शिक्षक!
Biplab Dasgupta यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात शिक्षक म्हणून केली होती. आयुष्याचे काही वर्ष त्यांनी शिक्षकपद बजावले. पण मनात असणाऱ्या अभिनयाच्या छंदापायी त्यांनी पूर्णवेळ अभिनयाला देण्याचे ठरवले. जादवपूर विद्यापीठात त्यांनी English Literature म्हणून शिक्षण घेतले.
‘या’ चित्रपटांमध्ये केले आहे काम
दिवंगत अभिनेते Biplab Dasgupta यांनी अनेक सिनेमांमध्ये काम केले आहे. यापैकी त्यांचे गाजलेले सिनेमे ‘गुमनामी, जुल्फिकार, आणि Konttho आहे. बंगाली भाषी सिनेक्षेत्रातून त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे. तसेच संपूर्ण भारतातून आदरांजली वाहिली जात आहे. त्यांचे जाणे, बंगाली सिनेचाहत्यांसाठी मोठा धक्का मानला जात आहे. १९९८ मध्ये ‘द बंगाली नाईट’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. यामध्ये Biplab Dasgupta यांनी केलेला अभिनय आजही सिनेप्रेक्षकांच्या मनावर राज्य करतो. पुढे, ‘शॅडोज ऑफ टाइम’मुळे त्यांच्या कारकिर्दीला वेग मिळाला. ‘काहिनी’ या मालिकेला 1996 मध्ये प्रदर्शित करण्यात आले, या मालिकेत Biplab Dasgupta यांनी महत्वाची भूमिका साकारली. तसेच अनेक बंगाली दूरदर्शन मालिकांमधील दमदार अभिनयामुळे त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली.






