Actress Shilpa Shetty Reveals She Is Scared Of This Thing
बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) हिचा आज (8 जून) तिचा 50 वा वाढदिवस आहे. दोन मुलांची आई असलेल्या शिल्पा शेट्टीच्या वयाचा अंदाज लावणं अजूनही थोडं कठीणच आहे. बॉलिवूड इंडस्ट्रीपासून ते चाहत्यांपर्यंत शिल्पाला केवळ अभिनेत्री म्हणूनच नाही तर, ‘फिटनेस क्वीन’ म्हणूनच प्रसिद्ध आहे. शिल्पा जितकी उत्तम डान्सर आहे, तितकाच सुंदर ती अभिनयही करते. बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी शिल्पाने तिच्या करिअरची सुरुवात जाहिरातीतून केली होती. आता ती बॉलिवूड विश्व गाजवतेय.
शिल्पा शेट्टी हिचा जन्म ८ जून १९७५ ला कर्नाटकातील मेंगळूरू इथं झाला. शिल्पानं तिचं शालेय शिक्षण चेंबूर इथल्या सेंट अँथनी गर्ल्स हायस्कूलमधून पूर्ण केलं. १२ वीनंतर शिल्पानं पोद्दार महाविद्यालयात प्रवेश घेतला. शाळेत असल्यापासूनच शिल्पाला खेळाची आवड होती. त्यामुळेच ती वॉलिबॉल आणि बेस बॉल टीमची कॅप्टन होती. १६ वर्षांची असताना शिल्पाने मॉडेलिंग करायला सुरुवात केली. शिल्पानं पहिली जाहिरात केली ती लिम्का या कोल्ड ड्रींकची. त्यानंतर तिनं मॉडेलिंगमध्ये बस्तान बसवलं. मॉडेलिंग करत असताना शिल्पानं अभिनयाच्या विश्वात पाऊल टाकलं.
“फोन करून माझी बायको मला म्हणते…”, प्रसिद्ध अभिनेत्याची परदेशात असलेल्या पत्नीसाठी भावूक पोस्ट
१९९३ मध्ये प्रदर्शित झालेल्या बाजीगर या सिनेमातून शिल्पानं सिनेमाविश्वात पदार्पण केलं. या सिनेमात शिल्पानं काजोल आणि शाहरुख खान यांच्याबरोबर काम केलं. हा सिनेमा खूप यशस्वी झाला. शिल्पाचा हा पहिलाच सिनेमा होता. त्यानंतर तिनं कधीही मागं वळून पाहिलं नाही. आज शिल्पा एक यशस्वी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. ती अनेकांसाठी रोल मॉडेलही आहे. अभिनेत्री म्हणून यशस्वी ठरलेली शिल्पा यशस्वी बिझनेस वुमन देखील आहे. शिल्पा अभिनयाव्यतिरिक्त जाहिरात, फिटनेसशी संबंधित व्यवसाय, कपड्यांचा ब्रँड आणि हॉटेल व्यवसायात देखील शिल्पा कार्यरत आहे.
शिल्पा फिटनेससंबंधित अनेक व्यवसाय करत असून त्यातूनही तिला भरभक्कम पैसे मिळतो. काही वर्षांपूर्वी शिल्पानं योगाची DVD काढली होती. तसंच तिनं हेल्दी डाएटवर पुस्तकही लिहिलं आहे. तिचा स्वतःचा एक फिटनेस ॲप देखील आहे. कोट्यवधी रुपयांच्या संपत्तीची मालकीण असलेल्या शिल्पाला कोणत्याच गोष्टींची कमतरता नाही. तिला हवी ती गोष्ट सहज विकत घेऊ शकते. असं असलं तरी शिल्पाला एका गोष्टीची खूपच भिती वाटते. ती गोष्ट म्हणजे, कार ड्रायव्हिंग करणे. शिल्पाला कार ड्रायव्हिंगची खूप भिती वाटते. तिनं आजतागायत कधीही गाडी चालवलेली नाही. तिची गाडी कायम ड्रायव्हरच चालवतो. जेव्हा शुटिंगवेळी गाडी चालवण्याची वेळ येते तेव्हा ती स्टंटमॅन वापरते.