indrayani and lay avdtes tu mala serial mahasangam see gudi padwa special episodes
कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘इंद्रायणी’ आणि ‘#लय आवडतेस तू मला’ यांचा महासंगम गुढीपाडवा विशेष भाग येत्या ३० तारखेला दु. १ आणि संध्या ७ वा, आपल्या कलर्स मराठीवर बघायला मिळणार आहे. अनेक उत्कंठावर्धक ट्विस्ट आणि कथेतील नवे वळण प्रेक्षकांना खिळवून ठेवणार हे निश्चित.
गुढीपाडव्याच्या मंगलदिनी सानिका आणि सरकार आपल्या नवीन आयुष्याच्या प्रारंभासाठी शुभेच्छा मागत असतानाच, त्यांच्या सुखद संसारावर संकटाचे सावट गडद होत चाललं आहे. त्यांच्या लग्नाला सानिकाच्या आई-वडिलांचा आशीर्वाद मिळावा, अशी सानिकाची इच्छा आहे. याचक्षणी, इंद्रायणीची साथ सरकार – सानिकाला मिळणार आहे ज्यात ती सानिकाला वचन देत मोठ्या आत्मविश्वासाने सांगते की, तिच्या आई-वडिलांचा आशीर्वाद नक्कीच मिळेल.
मिठूवर झालेल्या घटनेमुळे पिंगा गर्ल्सची मैत्री धोक्यात, मालिकेत येणार नवं वळण ?
आता इंद्रायणी हे कसे घडवून आणणार ? सानिका – सरकारला तिच्या आई – वडिलांचा आशीर्वाद मिळेल? त्यांचे लग्न निर्विघ्नपणे पार पडेल ? जणून घेण्यासाठी बघा गुढीपाडवा विशेष – ‘इंद्रायणी’ आणि ‘#लय आवडतेस तू मला’ दोन तासाचा भाग रविवार ३० मार्च दु. १ आणि संध्या ७ वा, आपल्या कलर्स मराठीवर.
सरकार म्हणजेच तन्मय जक्का म्हणाला, “या विशेष भागाच्या शूटिंगदरम्यान संपूर्ण टीमने जिद्द आणि समर्पणाने काम केले. १५० जणांचा मोठा ताफा आणि सलग ४-५ दिवस उन्हाच्या कडक तापमानात आम्ही हा भव्य एपिसोड शूट केला. अर्थात, अशा कठीण परिस्थितीतही प्रोडक्शन हाऊसने प्रत्येकाची विशेष काळजी घेतली. कलाकार आणि तंत्रज्ञांसाठी योग्य सुविधा, विश्रांतीसाठी आवश्यक व्यवस्था आणि थंड पेयांची सोय करण्यात आली होती. या कठीण परिस्थितीतही शूटिंगचा अनुभव अविस्मरणीय ठरला. आम्ही एक कुटुंबासारखे एकत्र आलो, हसलो, मजा केली आणि चांगल्या कंटेंटसाठी मेहनत घेतली. प्रेक्षकांना एक अप्रतिम अनुभव द्यायचा होता, आणि आम्ही तो जीव ओतून दिला. आता आमच्या मेहनतीचं फळ ३० मार्चला प्रेक्षकांच्या प्रेमाच्या रूपाने मिळेल, याची खात्री आहे.”
एकीकडे, जेलमध्ये साहेबरावांच्या हातात सानिका आणि सरकारचा जळणारा फोटो दिसतो. नव्या वर्षात या जोडप्याला आयुष्य मिळणार नाही, असा इशारा देत त्यांनी लग्नाआधीच या जोडप्याला मारण्याची सोय करून ठेवली आहे. परंतु, इंद्रायणीच्या कीर्तनाचा प्रभाव त्यांच्या मनावर होत असून, परिवर्तनाचा नवा अध्याय लिहिण्यासाठी ते सज्ज होतील का ? दुसरीकडे, लग्नमंडपात सानिका आणि सरकार आनंदाने विवाहबद्ध होत असतानाच, जय आणि त्याचे गुंड हातात तलवारी घेवून हल्ला करण्यास येतात. परंतु, संकटांना धैर्याने सामोरे जाण्याचा निर्धार करत सरकार आणि सानिका ठामपणे उभे राहतात. “आता कुणीच आम्हांला थांबवू शकत नाही,” असा आत्मविश्वास व्यक्त करत ते या संकटाचा सामना करण्यासाठी तयार होतात.
‘झी नाट्य गौरव’मध्ये दिवंगत अतुल परचुरेंच्या रुपात आला ‘हा’ अभिनेता, प्रेक्षकांना अश्रू अनावर
हा महासंगम विशेष भाग प्रेक्षकांसाठी एक अभूतपूर्व अनुभव ठरणार असून, कथानकाच्या उत्कंठावर्धक वळणामुळे प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे. ‘इंद्रायणी’च्या कीर्तनाच्या प्रभावामुळे साहेबरावांच्या मनात परिवर्तन होईल का ? जय आणि त्याच्या गुंडांचा कट यशस्वी होईल की प्रेमाच्या आणि सकारात्मकतेच्या बळावर सानिका आणि सरकार यशस्वी होतील? या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत महासंगमच्या विशेष भागामध्ये.