(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
तेलुगू सुपरस्टार ज्युनियर एनटीआर हैदराबादमध्ये जाहिरातीच्या शूटिंग दरम्यान जखमी झाला आहे. त्याच्या अपघाताच्या बातम्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, या बातमीमुळे त्याच्या चाहत्यांनी चिंता व्यक्त केली आहे. अभिनेत्याच्या टीमने एक स्टेटमेंट जारी करत ही माहिती दिली आहे की , ”जाहिरातीच्या शूटिंगदरम्यान त्याला किरकोळ दुखापत झाली आहे. तसंच त्याला काही दिवस विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.” त्याची प्रकृती स्थिर असून काळजी करण्याचं काहीही कारण नाही. चाहते, मिडिया आणि सर्व लोकांनी कोणतेही तर्क लावू नये अशी विनंती आह.”
Wishing you a full and speedy recovery, Jr. NTR @tarak9999 anna We’re all thinking of you.#JrNTR #NTRNeel #ntr31 pic.twitter.com/uauDyKQlZ1
— Chandu Gowrabathini (@Chandu090427) September 19, 2025
जूनियर एनटीआर ‘वॉर 2’ मध्ये झळकला
काही दिवसांपूर्वीच त्याचा ‘वॉर २’ सिनेमा रिलीज झाला होता.जूनियर एनटीआरने यावर्षी ‘वॉर 2’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यांच्या अभिनयाला प्रेक्षकांची चांगली प्रतिक्रिया मिळाली, मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसे यश मिळवू शकला नाही.अयान मुखर्जी दिग्दर्शित या चित्रपटात हृतिक रोशन देखील मुख्य भूमिकेत होता.
‘दशावतार’ या मराठी ब्लॉकबस्टरचा गोव्यात धुमाकूळ! मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केले कौतुक
‘वॉर 2’ ने भारतात बॉक्स ऑफिसवर सुमारे ₹236.55 कोटीची कमाई केली.मात्र, या चित्रपटाचे बजेट सुमारे ₹400 कोटी असल्याचे सांगितले जाते, त्यामुळे आर्थिकदृष्ट्या हा चित्रपट अपेक्षेप्रमाणे कामगिरी करू शकला नाही आणि बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला.
आर्यन खानने बॅड्स ऑफ बॉलिवूड प्रीमियरसाठी सर्व वर्गमित्रांना केले आमंत्रित, फोटो व्हायरल
जूनियर एनटीआरचा आगामी चित्रपट
ज्युनियर एनटीआर लवकरच केजीएफ दिग्दर्शक प्रशांत नील यांच्या पुढील चित्रपटात दिसणार आहे.या चित्रपटाचे चित्रीकरण या वर्षी एप्रिलमध्ये सुरू झाले होते आणि जून 2026मध्ये मोठ्या पडद्यावर येणार आहे. एनटीआरचे चाहते या चित्रपटासाठी खूप उत्सुक आहेत.