बॉलिवूडचा सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता वरुण धवन आणि सुंदर अभिनेत्री कियारा अडवाणी सध्या त्यांच्या आगामी ‘जुग जुग जिओ’ या चित्रपटाचे प्रमोशन करत आहेत. या दरम्यान, प्रमोशनच्या वेळी या जोडप्याचे काही फोटो इंटरनेटवर चांगलेच व्हायरल होत आहेत. हा एक फॅमिली ड्रामा चित्रपट आहे.
ज्याचा फोटो आणि व्हिडिओ कियाराने तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. कियाराने शॉर्ट चोली आणि लाँग स्कर्ट घातला आहे, तर, वरुणही मस्त लूक मध्ये डान्स करतांना दिसत आहे. वरुणने ओपन शर्ट आणि डेनिम जीन्ससोबत ब्लॅक शेड्स घातले आहेत. ज्यामध्ये त्याची स्टाइल लोकांना खूप पसंत केली जात आहे. या दोघांच्या भन्नाट जोडीचा एक व्हिडिओ सध्या वायरल होत आहे.
ज्यामध्ये अनिल कपूर आणि वरुणची जोडी अप्रतिम दिसत आहे. या चित्रपटात वरुण आणि कियारा हे विवाहित जोडपे दाखवण्यात आले आहेत. या चित्रपटात अभिनेत्री नीतू कपूरही दिसणार आहे. अशा परिस्थितीत वरुण आणि कियारा त्यांच्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी दिल्लीला पोहोचले आहेत.