(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
‘लक्ष्मी निवास’ ही झी मराठीवरील एक लोकप्रिय मालिका आहे. मालिकेत अनेक कलाकार असून मालिकेत सतत नवे ट्विस्ट दाखवले जातात. अलीकडेच या मालिकेचा एक नवा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. पण हा प्रोमो पाहून आता प्रेक्षक नाराज झाले असून त्यांनी मालिकेवर संताप व्यक्त केला आहे.
लक्ष्मी निवास’ मालिकेत, जयंतच्या त्रासामुळे जान्हवी समुद्रात उडी मारते. पण ती वाचते आणि विश्वाच्या घरी येते. काही काळानंतर तिला कळतं की हे घर तिच्या मित्र विश्वाचंच आहे. तसेच विश्वाला तिच्याबद्दल प्रेम आहे हेही तिला समजतं.
आता विश्वाचा संसार सुखाचा व्हावा आणि त्याने आयुष्यात पुढे जावं म्हणून जान्हवी प्रयत्न करत आहे. दुसरीकडे, विश्वा म्हणजे मॅड हा जान्हवीचा मित्र असल्याचे जयंतला माहीत असतं, परंतु जान्हवी जिवंत आहे आणि ती विश्वाच्याच घरी राहते, हे त्याला माहित नसतं.
झी मराठीने शेअर केलेल्या नवीन प्रोमोमध्ये जयंत, विश्वाच्या घरी येताना दिसतो. आता तो येतो तेव्हा त्याला जान्हवी दिसणार का? हे पाहणे प्रेक्षकांसाठी उत्सुकतेचं ठरणार आहे.
हेमा मालिनी यांना लागला ‘दुसरी बायकोचा’ टॅग, तरीही धर्मेंद्र यांच्याशी लग्न करण्याचा का घेतला निर्णय?
‘लक्ष्मी निवास’च्या नवीन प्रोमोमध्ये जान्हवी सईसाठी एक सरप्राईज तयार करते. ती म्हणते की सईला हे नक्कीच आवडेल आणि ती तिथून निघून जाते.नंतर सई रूममध्ये येते आणि केलेलं सजावट पाहून खूप खुश होते. ती म्हणते, “वा! किती सुंदर सरप्राईज दिलंस!” तेव्हा विश्वा तिथे येतो आणि सईला केक भरवतो. पण विश्वाला सईमध्येही जान्हवीच दिसते.
दारामागे उभी जान्हवी हे सगळं पाहते आणि तिच्या चेहऱ्यावर आनंद दिसतो.तेवढ्यात जयंत तिथे पोहोचतो आणि म्हणतो, “मी किती फोन केले, पण तुम्ही उचललाच नाही.” आणि तो घरात आत येतो.आता पाहायचं म्हणजे जयंतला जान्हवी विश्वाच्या घरी दिसणार का?याचीच उत्सुकता प्रेक्षकांमध्ये आहे.
‘तो मराठी आहे म्हणून…’, प्रणित मोरेला पाठिंबा देण्यासाठी पुढे आली मराठमोळी अभिनेत्री; चाहत्यांनी केले ट्रोल
झी मराठीने शेअर केलेल्या या प्रोमोवर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त करत कमेंट्स केल्या आहेत. एकाने लिहिले , नाही येणार.. असंच वेढ्यात काढतात पब्लिकला, तर दुसऱ्याने लिहिले, चांगली मालिका फालतू केली, तिसऱ्याने कमेंट केलेस काहीतर चांगले दाखवा.अशा अनेक कमेंट्स प्रेक्षकांनी केल्या आहेत.






