(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
अभिनेत्री तेजश्री प्रधान सध्या ‘वीण दोघांतली ही तुटेना’ या मालिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. या मालिकेत तेजश्रीने स्वानंदी ही भूमिका साकारली आहे. तेजश्री तिच्या कामाबरोबरच सोशल मीडियावर सक्रिय असून, चाहत्यांसोबत तिच्या कामाविषयी आणि आयुष्यातील खास क्षण शेअर करत असते.तेजश्री प्रधान नवीन सुरुवात करत असल्याची पोस्ट तिने काही दिवसांपूर्वी केली होती. सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करून तिने चाहत्यांना गुड न्यूज दिली होती. हा व्हिडिओ शेअर करत तिने नवीन वेब सीरीज, नवीन सुरूवात असे लिहिले होते.
व्हिडिओ शेअर करताना ती कोणत्या वेब सीरीजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येतेय. याबद्दल काहीही लिहिले नव्हते, मात्र तिला एका नवीन भूमिकेत पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. आता तेजश्रीने सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले आहेत.या फोटोमध्ये तेजश्री एकदम कूल लूकमध्ये दिसत आहे. निळ्या रंगाची जिन्स आणि गुलाबी रंगाच्या शर्टमध्ये ती दिसत आहे.या पोस्टमधून अस समजत आहे की तिच्या नवीन वेब सीरिजच्या शूटिंगला सुरूवात झाली आहे. हे तिच्या हातातील पाटीवरून समजत आहे.
हे फोटो शेअर करताना तिने दियाला भेटा असे लिहिले आहे. याचाच अर्थ तिच्या भूमिकेचे नाव दिया असल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच याबद्दलची माहिती लवकरच शेअर करेन असेही लिहिले आहे.
तेजश्री प्रधानच्या नवीन फोटोंवर सोशल मीडियावर प्रेक्षकांनी जोरदार प्रतिसाद दिला आहे. तिच्या या लूकमुळे नेटकऱ्यांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.कमेंट्समध्ये हार्ट इमोजी पाठवली आहे तर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. एकाने लिहिले, “या लूकमध्ये खूप सुंदर दिसत आहेस,” तर दुसऱ्या नेटकऱ्याने, “सुंदर लूक,” असं म्हटलं आहे. एकाने विचारले, “चित्रपट येणार आहे की मालिका?” तर आणखी एकाने लिहिले, “खूप सुंदर लूक आहे.”
इतर एक नेटकऱ्याने उत्सुकतेने लिहिले, “काहीतरी नवीन येतंय, आतापासूनच उत्सुकता वाढली आहे,” असे म्हणत तेजश्रीच्या आगामी प्रोजेक्टसाठी उत्सुकता दर्शवली आहे.






