फोटो सौजन्य - Social Media
2024 मध्ये शुभंकरने वैविध्यपूर्ण आणि लक्षवेधी भूमिका साकारल्या पण त्याचा फॅशन गेम मुळे सुद्धा तो चर्चेत राहिला आहे. चित्रपटाचे ट्रेलर लाँच असो किंवा कामाचा भाग म्हणून केलेलं फोटोशूट असो शुभंकरने या वर्षात फॅशन मध्ये देखील तितकेच प्रयोग केले आहे. हा अभिनेता नेहमीच प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसला आहे. तसेच अभिनेता अनेक मराठी मालिकेमध्येही झळकला आहे. ज्याने त्याच्या चाहत्यांमध्ये भर पडली आहे.
कायम वेगळ्या धाटणीच्या भूमिका असलेले चित्रपट करणारा शुभंकर ‘लाईक आनी सबस्क्राईब’, ‘कन्नी’ आणि ‘8 दोन 75’ या मराठी चित्रपटाचा महत्त्वपूर्ण भाग झाला. तिन्ही चित्रपट वेगवेगळ्या विषयांवर असले तरी शुभंकरची प्रत्येक भूमिका तेवढीच लक्षवेधी ठरली आहे. तसेच त्याचे पात्र आणि अभिनय प्रेक्षकाना सतत आवडले आहे. त्याच्या प्रत्येक चित्रपटाला सिनेमागृहात प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
कलाकार म्हणून अभिनेत्याने वर्षभर प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आणि वैयक्तिक आयुष्यात देखील एक लाख मोलाचा पल्ला गाठणारी गोष्ट त्याने या वर्षात केली आहे. तसेच, शुभंकरने वाढदिवसाच्या दिवशी नवी कार घेतली आणि तिचं नाव देखील तितकच खास ठेवलं. या कारचे नाव अभिनेत्याने लक्ष्मी असं ठेवले आहे. या नव्या कारची एक खास गोष्ट त्याने सोशल मीडियावर शेअर केली आहे.
2024 बद्दल बोलताना शुभंकर सांगतो “हे वर्ष माझ्यासाठी खरंच खूप भावनिक ठरलं अनेक चढ उतार सोबतीला घेऊन या वर्षाला निरोप घेतो आहे. या सगळ्या चढ उतारात घरचे, मित्र मंडळी अगदी हक्काने माझ्या पाठीमागे उभे होते. 2024 वर्षाला निरोप देताना सगळ्यांना मनापासून थैंक्स बोलावंसं वाटतं येणार वर खूप हेल्दी, स्ट्रोंग आणि भरपूर काम घेऊन येऊ दे ही आशा करतो.” असे त्यांनी सांगितले आहे.
वर्ष संपताना शुभंकरने त्याचा आवडत्या कलाकार मंडळी सोबत “विषामृत” नावाचं नाटक देखील केलं. तरुण पिढीचं प्रतिनिधित्व करणार हे नाटक सध्या रंगभूमीवर प्रेक्षकांचं प्रेम मिळवत आहे. तरुणांचे प्रश्न, नातेसंबंधांकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टीकोन, तरुणांचं भावविश्व या नाटकांमधून उलगडत आहे. शुभंकरने या नाटकात मुख्य भूमिका साकारली असून पुन्हा एकदा शुभंकरने तरुणाईला त्याचा प्रेमात पडायला भाग लावलं आहे. आता आगामी नवीन वर्षात शुभंकर अजून काय काय नव्या प्रोजेक्टचा भाग होणार आहे हे पाहणे उत्सुकतेच ठरणार आहे.