'गोंधळ' चित्रपटाची एका आठवड्याची कमाई फक्त...
काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या गोंधळ चित्रपटाची सुद्धा चांगलीच हवा पाहायला मिळाली होती. महाराष्ट्रातील एका महत्वाच्या लोककलेवर आधारित असलेला हा सिनेमा नक्कीच सुपरहिट ठरणार अशी सगळ्यांची अपेक्षा होती. त्यात दिग्गज संगीतकार पद्मविभूषण इल्लैयाराजा यांचे संगीत या चित्रपटाला लाभले. त्यामुळे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर किती कोटींचा गल्ला जमवेल? अशी उत्सुकता सगळ्यांनाच होती.
सोशल मीडियावरून ब्रेक घेणार बॉलिवूडचा ‘हा’ खलनायक, नेमकं कारण काय?
अशी आशा होती दशावतार पाठोपाठ गोंधळ चित्रपट देखील बोस ऑफिसवर कोटींचा गल्ला जमवेल. मात्र, असे काही होताना दिसत नाही आहे. Sacnilk च्या रिपोर्टनुसार, चित्रपटाने पहिल्या दिवशी फक्त 5 लाखांची कमाई केली दुसऱ्या दिवशी 1 लाखाची आणि तिसऱ्या दिवशी 11 लाखांची कमाई झाली. चित्रपटाची 9 दिवसांची एकूण कमाई फक्त 49 लाख रुपये आहे. यामुळे गोंधळ बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरताना दिसत आहे.
पुन्हा शाळेच्या आठवणींना मिळणार उजाळा, ‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’चा टीझर प्रदर्शित
डावखर फिल्म्स निर्मित या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद लेखन संतोष डावखर यांनी केले असून, या सिनेमाला पद्मविभूषण दिग्गज संगीतकार इल्लैयाराजा यांनी संगीत दिले आहे. दीक्षा डावखर सहनिर्माती म्हणून कार्यरत आहेत. चित्रपटात किशोर कदम, इशिता देशमुख, योगेश सोहोनी, निषाद भोईर, अनुज प्रभू, सुरेश विश्वकर्मा, माधवी जुवेकर, ऐश्वर्या शिंदे, कैलाश वाघमारे, प्रभाकर मठपती, विठ्ठल काळे, प्रवीण डाळिंबकर, शरद जाधव, पूनम पाटील आणि प्रशांत देशपांडे यांच्या महत्वपूर्ण भूमिका आहेत.






