‘बिग बॉस मराठी 5 चा विजेता सूरज चव्हाणचं नुकताच 29 नोव्हेंबर रोजी मोठ्या थाटामाटात लग्न सोहळा पार पडला आहे. सुरज चव्हाणच्या लग्नासाठी चाहत्यांनी प्रचंड गर्दी देखील दिसून आली. सूरज आणि सूरजची बायको संजना नवरा नवरीच्या रुपात खूपच सुंदर दिसत होते. सूरज आणि संजना शिवाय या लग्नात खास आकर्षण ठरली ती म्हणजे अभिनेत्री जान्हवी किल्लेकर. जान्हवी किल्लेकर ही सुरजची बिग बॉसच्या घरापासून बनलेली बहीण आहे. तिने त्याच्या लागणार खूप धमाल केली. मानाची करवली म्हणून संपूर्ण लग्नात तिचा उत्साह दिसून आला.
सूरज चव्हाणच्या लग्नात जान्हवी किल्लेकर त्याची मानाची करवली झाली होती. जान्हवी लग्नाआधीच्या सगळ्या विधींपासून सूरजसोबत होती. तिने त्याला खूप साथ देखील दिली, सूरज जिथे जाईल तिथे जान्हवी देखील दिसली आहे. सूरज चव्हाणच्या लग्नाची वरात देखील जान्हवी किल्लेकरनं गाजवली. सूरजच्या लग्नात त्याच्या बहिणीने चांगलीच धमाल मस्ती केली. जान्हवी संपूर्ण कार्यक्रमात खूप सुंदर आणि सुरेख दिसत होती. सूरजच्या लग्नाच जान्हवीने धमाल केली, वरातीत जीव ओतून नाचली आणि लग्न लावून घरी जाताच जान्हवी आजारी पडली.
जान्हवी इतकी आजारी पडली की तिला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. जान्हवीने तिचे हॉस्पिटलमधील फोटो आता स्वतःच सोशल मीडियावर शेअर केले आहेत. फोटो पाहून चाहत्यांना धक्काच बसला आहे. तसेच जान्हवीला नजर लागली असे म्हणत आहेत. ‘नजर इज रिअल’ असं कॅप्शन देत जान्हवीने तिचे हॉस्पिटल बेडीवरचे फोटो शेअर केले आहेत. जान्हवीला हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्याचं पाहून चाहत्यांनी चिंता व्यक्त केली आहे. आणि तिच्या लवकरच बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहेत.
स्मृती मंधाना–पलाश मुच्छल लग्न प्रकरणात नंदिका द्विवेदी कोण? नेमका वाद काय?
चाहत्यांनी कमेंट्स करत जान्हवीबद्दल काळजी व्यक्त केली आहे. सगळ्यांनी तिला काळजी घे असा सल्ला दिला आहे. हॉर्ट इमोजी शेअर करत जान्हवीवर प्रेमही व्यक्त केलं आहे. जान्हवीबद्दल बोलायचं झालं तर, ती ‘बिग बॉस मराठी’ च्या पाचव्या पर्वात सहभागी झाली होती. तिथे तिची आणि सुरज चव्हाणची भेट झाली. सुरज आणि जान्हवीमध्ये भाऊ – बहिणेचे नाते निर्माण झाले. आणि जान्हवी तेव्हापासून सुरजसोबत प्रत्येक गोष्टीत उभी आहे. आणि त्याला साथ देत आहे.






