(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
Bigg Boss 19 : बिग बॉसच्या या सीझनमध्ये कोण जिंकणार? या बाहेर काढलेल्या स्पर्धकाने दिले उत्तर
कबड्डीच्या सरावा बद्दल बोलताना केतकी म्हणाली, ‘तयारी जोरात सुरू आहे. आम्ही जवळपास दररोज प्रॅक्टिस करत आहोत. मी याआधी फारशी कबड्डी खेळलेली नाही, पण आता सराव करत आहे आणि बऱ्याच गोष्टी शिकत आहे. मी कबड्डीचे नियम शिकले असून प्रोफेशनल गेमचे व्हिडिओज पाहून अनेक गोष्टी समजून घेते आहे. कुठलाही खेळ असो, स्टॅमिना फार महत्त्वाचा असतो आणि मी त्यावरही काम करत आहे. वॉर्म अप, वर्कआउट्स, जॉगिंग करते.’
पुढे ती म्हणाली, ‘डाएटचीही काळजी घेते, फक्त या गेमसाठी नाही तर रोजच. मी जंक फूड आणि साखर टाळते. सध्या पावसाळा आहे, पण उन्हात खेळताना मी नेहमी स्वतःला हायड्रेट ठेवते, लिंबूपाणी किंवा इलेक्ट्रोलाइट घेत राहते,” असंही तिने सांगितलं. मालिकेतील हा कबड्डी स्पर्धेचा ट्रॅक निश्चितच प्रेक्षकांसाठी वेगळा अनुभव ठरणार आहे. टीम कमळी आणि टीम अनिका यांच्यातील ह्या रंगतदार सामन्याची उत्सुकता प्रेक्षकांच्या मनात वाढली असून लवकरच हा ट्रॅक प्रेक्षकांना पहाता येणार आहे.
‘पीछे देखो पीछे’ व्हायरल मुलगा अहमद शाहवर कोसळला दुःखाचा डोंगर, जवळच्या व्यक्तीला दिला निरोप
‘कमळी’ मालिकेबद्दल बोलायचे झाले तर ही मालिका प्रेक्षकांना जास्तच आवडत आहे. तसेच या मालिकेतील प्रत्येक भाग प्रेक्षकांची उत्सुकता वाढवतो. या मालिकेत अभिनेत्री विजया बाबर, केतकी कुलकर्णी आणि निखिल दामले हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसत आहेत. आता ‘कमळी’ मालिकेत कबड्डीचा थरारक ट्रॅक कसा रंगणार आहे पुढे काय घडणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.






