(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
प्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकर नेहमीच चर्चेत असतात.ते त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. वाद असो किंवा कौतुक मांजरेकर नेहमीच प्रामाणिकपणे आपलं मत मांडताना दिसतात. या चित्रपटात अभिनेता सिद्धार्थ बोडकेने छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली असून, प्रेक्षकांकडून या भूमिकेचं भरभरून कौतुक होत आहे.
नुकताच त्यांच्या लेकीने दिलेल्या एका मुलाखतीत महेश मांजरेकराबद्दल खास खुलासा केला आहे. सई मांजरेकर म्हणाली, मी माझ्या वडिलांकडून अनेक गोष्टी शिकले आहे आणि लक्षातही ठेवल्या आहेत. माझे वडील जेंव्हाही भारताबाहेर जातात, त्यावेळी कायमच ते त्यांच्या खिशात एक लसणाच्या चटणीची पुडी ठेवतात. त्यांचे म्हणणे आहे की, बाहेरील जेवणाला चव नसते, म्हणून त्यांच्या खिशात कायम लसणाच्या चटणी असते. ”
ती पुढे म्हणाली, ”आता त्यांची ही सवय मला देखील लागली आहे.मी देखील माझ्या बॅगमध्ये मिरची किंवा कोणतीही चटणी ठेवते. ”
सई मांजरेकर हिने देखील बॉलिवूडमध्ये पर्दापण केले आहे. सलमान खान सोबत काम करण्याची संधी तिला थेट मिळाली. सईने मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. ‘दबंग ३’, ‘घूमर’, आणि ‘मेजर’ यांसारख्या चित्रपटांनंतर ती नव्या प्रोजेक्ट्समध्येही व्यस्त आहे.
दरम्यान, सई सध्या तिच्या डेटिंगच्या बातम्यांमुळेही चर्चेत आहे. ती साजिद नाडियाडवालाचा मुलगा सुभान नाडियाडवाला याला डेट करत असल्याचे बोलले जात आहे. जरी या दोघांकडून अद्याप अधिकृत माहिती मिळालेली नसली, तरी त्यांच्या सोशल मीडिया पोस्ट्स मुळे हत्यांमध्ये चर्चेला उधाण आलं आहे. सई सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. ती तिच्या चाहत्यांसाठी खास फोटो व्हिडिओ शेअर करत असते.
अभिनेत्री सई मांजरेकर ‘मेजर’ आणि ‘औरो में कहा दम था’ अशा बिग बजेट बॉलिवूड सिनेमातून प्रेक्षकांच्या मनात घर करायला यशस्वी झाली आहे. तिच्या करिअरला नेहमीच तिच्या वडील महेश मांजरेकर यांचा सपोर्ट मिळाला आहे, जो तिला प्रत्येक प्रोजेक्टमध्ये मार्गदर्शन करतो.






