(फोटो सौजन्य - अकाउंट)
मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता संतोष जुवेकर सध्या ट्रोलिंगचा सामना करताना दिसत आहे. ‘छावा’ या ऐतिहासिक चित्रपटात त्याने महत्त्वाची भूमिका साकारली होती. त्याचा अभिनय पाहून चाहत्यांनी त्याचे अनेकदा कौतुकही केले. मात्र, त्याने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेता अक्षय खन्ना याच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरून सोशल मीडियावर संतोषवर भरपूर टीका करताना लोक दिसत आहे. एकीकडे संतोष जुवेकर ट्रोलिंगचा सामना करतोय तर दुसरीकडे वैयक्तिक आयुष्यातही तो तितकाच संघर्ष करत असल्याचे संगीतकार अवधूत गुप्ते यांनी सांगितले आहे. अभिनेत्याचे आई-वडील असून संतोष एकटा राहतो. तसेच, संगीतकार अवधूत गुप्ते याने याबद्दल पोस्ट करून मित्राला पाठिंबा देताना दिसला आहे.
हाच तो, खरा मराठी साज! अमृता देशमुखचे गोड हास्य पाहून घायाळ व्हाल, बरं का?
संतोष जुवेकरच्या मेहनतीचा केला खुलासा
अभिनेता संतोष आणि अवधूत या दोघांनीही मराठी सिनेमाशसृष्टीत अनेक चित्रपट एकत्र केले आहेत. त्यामुळे या दोघांची घट्ट मैत्री अनेकदा चाहत्यांना पाहायला मिळाली आहे. संतोषने अभिनयासाठी खूप मेहनत घेतली आहे. आणि याचबाबत संगीतकार म्हणाला, “झेंडा’ चित्रपटात ‘संत्या’ची भूमिका जिवंत करण्यासाठी संपूर्ण शूटिंगदरम्यान तो चाळीत राहिला होता. ‘मोरया’च्या वेळीही त्याने असेच केले होते. ‘एकतारा’ हा चित्रपट गायकाच्या आयुष्यावर आधारित असल्याने, त्या भूमिकेसाठी तो तब्बल एक वर्ष गिटार आणि गायन शिकत होता. त्याने माझ्या अनेक कार्यक्रमांना केवळ निरीक्षण करण्यासाठी हजेरी लावली होती.” असे अवधूतने शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिले आहे.
अवधूत पुढे म्हणाला, “इतर दिग्दर्शकांसोबत काम करतानाही संतोष तितकीच मेहनत घेत असतो. हीच जर त्याची अॅक्टिंग ‘मेथड’ असेल, तर आपण ती स्वीकारली पाहिजे. कारण त्याचा अभिनय निर्विवादपणे उत्कृष्ट असतो!” असे तो म्हणाला.
कुटुंब असतानाही एकटा राहतो अभिनेता
संतोष जुवेकर अभिनयासाठी इतका वेडे आहे की तो आई वडील असून देखील एकटा राहत आहे. मात्र, तो आपल्या आई-वडिलांची आणि पुतणीची काळजी घेतो. अवधूत गुप्तेने त्याच्या पोस्टमध्ये लिहिले की, “अभिनयाच्या ह्याच वेडापाई संतोष आजही एकटा राहतो. अर्थात, एकटा राहत असून सुद्धा त्याच्या एकट्याचा संसार हा दृष्ट लागण्यासारखा आहे! त्याचं घर कधीही जाऊन बघा. एखाद्या गृहिणीलाही लाजवेल इतकं टापटीप असतं! एकटा राहूनही त्याचा संसार सुरळीत आहे. कुठल्याही मराठी अभिनेत्याप्रमाणे त्यालाही काटकसर करावी लागते. मात्र, त्याने कधी कुणाचे पैसे बुडवल्याचं किंवा नको ती देणी करून ठेवल्याचं माझ्या ऐकण्यात आलं नाही.”
Chhaava Movie: संसदेत होणार ‘छावा’चं स्क्रीनिंग; पंतप्रधान मोदींसह खासदार राहणार उपस्थित
ट्रोल करणाऱ्यांना अवधूत गुप्तेने दिले चोख प्रत्युत्तर
संतोष जुवेकरवर टीका करणाऱ्या लोकांना अवधूत गुप्ते यांनी खडे बोल सुनावले. तो म्हणाला, “संतोषने एखाद्या चित्रपटानंतर जरा अधिक श्रेय घ्यायचा प्रयत्न केला, तर लगेच त्याची खिल्ली उडवली जाते. मात्र, वर्षानुवर्षे संघर्ष करून यश मिळवल्यानंतर आनंद साजरा करणं हास्यास्पद नाही, तर ते त्याच्या मेहनतीचं फळ आहे.” अवधूत गुप्ते म्हणतात, “ही फक्त संतोषची शोकांतिका नाही, तर अनेक मराठी कलाकारांची आहे. एखादा कलाकार वर्षभर मेहनत करून चित्रपट काढतो आणि रिलीज झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी लोक विचारतात, ‘बाकी नवीन काय करतोयस?’ कलाकारांच्या भावनांचा विचार न करता केलेलं ट्रोलिंग म्हणजे फक्त क्रूर विनोद आहे. दगडावर उमलू पाहणाऱ्या फुलाचा संघर्ष कबरीवरच्या बुरशीला कधीच कळणार नाही!” अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.”