फोटो सौजन्य - Social Media
शंशाकच्या लेकाने ‘राजा शिवाजी’ चित्रपट पाहण्याचा एक गोड हट्ट धरला आहे. इतकेच नव्हे तर ते चित्रपट पाहताना त्याने बाबाकडे आणखीन एक विशेष हट्ट केला आहे. शशांकने ते पूर्णही केले आहे आणि त्यावर एक पोस्टही शेअर केली आहे.
काय म्हणतोय शशांक?
अभिनेता शशांक केतकर त्याच्या मुलासह ठाण्यात राजा शिवाजी सिनेमा पाहण्यासाठी जात आहे. त्यावेळी त्याने त्याचा मुलगा ऋग्वेदसह व्हिडीओ तयार केली आहे. लेकाविषयी सांगताना तो म्हणतो की, “ऋग्वेद, छत्रपती शिवाजी महाराजांपासून फार Inspire आहे. त्याला रात्री झोपताना तसेच सकाळी उठल्यावर छत्रपती शिवरायांच्याच गोष्टी ऐकायला आवडतात. त्याला छत्रपतींच्या किल्ल्यांची महती ऐकायला आवडते. ऋग्वेदकडे खेळणीदेखील तलवार, ढाल असे आहेत. दिनरात तो त्यांनीच खेळत असतो. जेव्हा मी त्याला आपण राजा शिवाजी चित्रपट पाहायला जाणार आहोत हे सांगितले तेव्हा त्याने मला एक विनंती केली.” शशांक त्याच्या लेकाला दाखवतो. ऋग्वेदने छत्रपती शिवाजी महाराजांचा पेहराव केलेला असतो. शशांक म्हणतो की,”ऋग्वेदने फिल्म पाहायला जाताना मला छत्रपती शिवाजी महाराजांचा वेष परिधान करायचा आहे.” आपल्या मुलाचे हट्ट पुरवत शशांक ऋग्वेदला छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपात तयार करतो.
पोस्टखाली शशांकने ‘आमचे बाळ शिवाजी’ असे कॅप्शन दिले आहे. तसेच रितेश देशमुखांपर्यंत ही Video पोहचेल अशी आशा व्यक्त केली आहे. शशांकच्या ऋग्वेदला बाळ शिवाजी महाराजांच्या रूपात पाहून अनेक सिनेकलाकरांनी ‘गोड, गोंडस, God Bless You’ असे कमेंट्स केले आहेत.






