(फोटो सौजन्य -इन्स्टाग्राम)
लोकप्रिय मालिका “वीण दोघांतली ही तुटेना” मध्ये सध्या लग्नाचं वातावरण आहे. राजवाडे आणि सरपोतदार कुटुंब एकत्र येऊन लग्नसोहळ्याचा आनंद घेत आहेत. आधिरा आणि स्वानंदीच्या चूडा विधीमुळे सगळीकडे सेलिब्रशनचा उत्साह आहे. मात्र, या आनंदात एक अनपेक्षित वळण येणार आहे, ज्यामुळे सर्वजण चकित होणार आहेत.
स्वानंदीच्या चूडा सोहळ्यात सोन्याच्या बांगड्यांच्या जागी बेंटेक्सच्या बांगड्या येतात. तिच्या हातात सोन्याऐवजी बेंटेक्सच्या बांगड्या चढवल्या जातात. सध्यातरी ही गोष्ट कोणाच्या लक्षात नाहीये. या घटनेमागे कोणाचा हात आहे, हा प्रश्न सर्वांना विचारात टाकणारा ठरणार आहे. दरम्यान, राजवाडे कुटुंबातही एक वेगळीच अडचण उभी राहते. आधिराच्या चूडा विधीमध्ये अचानक घडलेल्या या अपघातामुळे समारंभातील वातावरण बदलत. आनंदी वातावरणात अचानक आलेला हा अपशकुन कुटुंबासाठी धक्कादायक ठरणार आहे. या प्रसंगानंतर समर समोर दोन्ही कुटुंबांमधील परिस्थिती शांत करण्याचं एक मोठ आव्हान उभं आहे. आता या घटनेमागील सत्य उलगडत असताना अनेक नाती परिक्षेत उतरतात.
दक्षिण गोव्याच्या आलिशान फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये हा विवाहसोहळा पार पडणार असून समुद्रकिनाऱ्याच्या मनोहारी वातावरणात ‘बीच वेडिंग’चा थाटमाट पाहायला मिळणार आहे. सजवलेला समुद्रकिनारा, सुंदर फुलांनी नटलेला मंडप आणि कलाकारांचे आकर्षक पोशाख हे या विशेष भागाचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे. २९ ऑक्टोबरपासून ते ११ नोव्हेंबरपर्यंत हा जल्लोष रंगणार असून, राजवाडे आणि सरपोतदार कुटुंब प्रत्येक दिवस एक नवा सोहळा घेऊन येणार आहेत. गोव्याच्या निसर्गरम्य वातावरणात, आधिरा- रोहन आणि स्वानंदी- समर यांच्या यांचं डेस्टिनेशन वेडिंग होणार आहे. मुहूर्तमेढ, मेहेंदी, चुडा, हळद, सीमांत पूजन आणि शेवटी अविस्मरणीय विवाहसोहळा हा प्रत्येक कार्यक्रम या मालिकेच्या निमित्ताने प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे.






