सिद्धार्थ मल्होत्राच्या (Sidharth Malhotra) आगामी ‘योद्धा’ या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. हा चित्रपट मार्चमध्ये प्रदर्शित होणार आहे पण सध्या या चित्रपटाचं नवीन दमदार पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे. हे पोस्टप पाहून चाहत्यांचा उत्साह आणखी वाढणार यात शंका नाही. यामध्ये मुख्य अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राची ॲक्शन स्टाइल वेगळी आणि काहीशी आक्रमक दिसत आहे.
[read_also content=”सारा अली, अनुष्का शर्मा ते उर्मिला मातोंडकर यांचं ओटीटी विश्वास पदार्पण! धमाकेदार चित्रपटांची मिळणार मेजवानी https://www.navarashtra.com/movies/sara-ali-khan-anushka-sharma-urmila-matondkar-will-have-ott-debut-2024-nrps-508209.html”]
रोहित शेट्टीच्या ‘इंडियन पोलिस फोर्स’नंतर आता सिद्धार्थ ‘योद्धा’मधून प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहे. या चित्रपटात सिद्धार्थ जबरदस्त ॲक्शन सीन्स करताना दिसणार आहे. चित्रपटाच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या पोस्टरमध्ये सिद्धार्थचा ॲक्शन मोड स्पष्टपणे दिसत आहे. सिडचा नवा अवतार दाखवणाऱ्या या पोस्टरनंतर उद्या या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात सिद्धार्थशिवाय दिशा पटानी आणि राशि खन्ना देखील दिसणार आहेत. सागर आणि पुष्कर ओझा संयुक्तपणे याचं दिग्दर्शन करत आहेत.
सिद्धार्थने स्वतः त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून हे नवीन पोस्टर पोस्ट केलं आहे. या पोस्टरमध्ये त्याच्या हातात बंदूक दिसत असून त्याना नेम धरलेला दिसतोय. पोस्टरमध्ये सिद्धार्थचा युद्धासाठी सज्ज असलेला लूक उत्कृष्ट आणि दमदार दिसत आहे. चाहत्यांनीही त्याच्या स्टाईलचे खूप कौतुक केले आहे. ‘ब्रेस फॉर इम्पॅक्ट’ या चित्रपटाची टॅगलाइनही लक्ष वेधून घेते. पोस्टर शेअर करण्यासोबतच सिद्धार्थने लिहिले आहे – ‘फोकस सेट आहे, डेस्टिनेशन समोर आहे!’ यासोबतच सिद्धार्थने फायर इमोजी देखील जोडला आहे. हा चित्रपट 15 मार्च रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.