(फोटो सौजन्य - x अकाउंट)
लोकप्रिय कोरियन अभिनेत्री ली सेओ यी यांच्या निधनाची वाईट बातमी समोर आली आहे. वयाच्या ४३ व्या वर्षी त्यांनी या जगाचा निरोप घेतला आहे. आता त्यांच्या निधनाच्या बातमीने इंडस्ट्री आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. आतापर्यंत कोणालाही माहिती नव्हते की अभिनेत्री ली सेओ यी या जगात नाहीत. आता त्यांच्या मॅनेजरने या बातमीला दुजोरा दिला आहे. तसेच, अभिनेत्री ली सेओ यी यांनी शेवटचा श्वास कधी घेतला हे उघड झाले आहे? या बातमीने इंडस्ट्रीमध्ये खळबळ उडाली आहे.
“आपल्या डोक्यात हवा गेली होती…” राशीचक्रकार शरद उपाध्येंनी निलेश साबळेंना चांगलंच सुनावलं…
ली सेओ यी यांचे २० जून रोजी निधन झाले
सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून ली सेओ यी यांच्या मॅनेजरने ली सेओ यी यांनी हे जग सोडून गेल्याची पुष्टी केली आहे. त्यांनी जारी केलेल्या अधिकृत निवेदनानुसार, २० जून रोजीच ली सेओ यी यांचे निधन झाले. आता मृत्यूच्या काही दिवसांनंतर ली सेओ यी यांच्या मृत्यूचे रहस्य बाहेर आले आहे. आतापर्यंत चाहत्यांना याबद्दल काहीच माहिती नव्हती. दुसरीकडे, कोरियन अभिनेत्री ली सेओ यी यांच्या मृत्यूमागील खरे कारण अद्याप उघड झालेले नाही. मृत्यूच्या कारणाबद्दल माहिती अजूनही गुलदस्त्यात आहे.
ली सेओ यी यांच्या मृत्यूचे कारण उघड झाले नाही
आता अभिनेत्री ली सेओ यी यांच्या व्यवस्थापकाने दुःख व्यक्त करत माहिती दिली आहे की सुंदर, किलबिलाट करणारी ली सेओ यी आता एका आकाशातला तारा बनली आहे. त्यांनी या पोस्टमध्ये लोकांना एक खास आवाहन देखील केले आहे. या अचानक आलेल्या बातमीने ली सेओ यी यांच्या चाहत्यांचे मन दुखावले आहे आणि सर्वांना धक्का बसला आहे. तथापि, या काळात अभिनेत्रीच्या व्यवस्थापकाने लोकांना तिच्या आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना करण्यास सांगितले आहे. त्यांनी कलाकाराच्या पालकांच्या वतीने ही पोस्ट शेअर केली आहे. ली सेओ यी या अभिनेत्रीने २०१३ मध्ये पदार्पण केले होते. ती ‘चेओंगडॅम-डोंग स्कँडल’साठी देखील ओळखली जाते.
पुणेकर दुपारी १ ते ४ का झोपतात ? अभिनेत्री नेहा शितोळेने सांगितलं कारण…
बातमी ऐकून चाहते निराश
मात्र, ‘द डिव्होर्स इन्शुरन्स’ मधून अभिनेत्रीला खरी ओळख मिळाली. अभिनेत्री ली सेओ यीने अनेक शोमध्ये पाहुण्या कलाकारांची भूमिका केली आणि चित्रपटांचाही भाग राहिली आहे. सध्या ती खूप काम करत होती आणि भविष्यात तिला अधिक यश मिळवायचे होते. तथापि, वयाच्या अवघ्या ४३ व्या वर्षी तिने जगाचा निरोप घेतला आहे. आता सोशल मीडियावरील चाहते अभिनेत्रीच्या आत्म्याच्या शांती मिळण्यासाठी प्रार्थना करत आहेत.