आपल्या कॉमेडीने लाखो लोकांना हसवणारे प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांना वर्कआउट दरम्यान हृदयविकाराचा झटका आल्याने दिल्लीच्या एम्समध्ये दाखल करण्यात आले आहे. रिपोर्ट्सनुसार, ते ट्रेडमिलवर पडले. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, राजूचा धाकटा भाऊ काजू (काजू श्रीवास्तव) देखील याच रुग्णालयात दाखल असल्याची बातमी समोर येत आहे. दैनिक जागरणच्या वृत्तानुसार, ‘त्यांच्या धाकट्या भावाचे ऑपरेशन झाले असून तो गेल्या ३ दिवसांपासून रुग्णालयात आहे. मात्र, राजू यांच्या प्रकृतीबाबत त्यांना कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
दरम्यान, राजूच्या कुटुंबीयांनी एक निवेदन जारी केले की, ‘राजू श्रीवास्तव यांची प्रकृती स्थिर आहे. आम्ही त्याच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहोत. डॉक्टर त्याच्यावर उपचार करत आहेत आणि सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. सर्व शुभचिंतकांनी दिलेल्या प्रेम आणि पाठिंब्याबद्दल धन्यवाद. कृपया कोणत्याही अफवा आणि खोट्या बातम्या पसरवू नका.’
राजू श्रीवास्तव यांचे जवळचे मित्र शेखर सुमन यांनी ट्विटरवर पोस्ट केली की, ‘राजूची तब्येत सुधारत आहे. गेल्या ४६ तासांपासून ते बेशुद्ध होते मात्र काही तासांपासून त्यांची प्रकृती सुधारत आहे. डॉक्टरांच्या मते, ‘गोष्टी थोड्या सकारात्मक दिसत आहेत.’