अभिनेत्री आणि खासदार कंगना राणौत नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणावरून चर्चेत असते. कधी सिनेमाला घेऊन तर कधी त्यांच्या वक्तव्या वरून. आता अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना राणौत तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. नुकताच झालेल्या मुलाखतीत कंगना यांनी खासगी आयुष्यावर मोठं व्यक्तव्य केलं आहे. या वक्तव्याची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. कंगनाने त्यांची डेटिंग लाईफ आणि लिव्हइन रिलेशनशिपवर मोठं वक्तव्य केलं आहे.
मुलाखतीत कंगना यांना त्यांच्या लग्नाबद्दल मुलाखतीत विचारण्यात आलं. तेव्हा त्यांनी यावर उत्तर दिलं की ‘तुम्हाला कसं माहिती की, मी अद्याप लग्न केलेलं नाही. तुम्ही मला ओळखत आहात असा विचार करु नका…’ त्यानंतर कंगना हसू लागल्या…कंगना पुढे म्हणाल्या, ‘लग्ना माझ्या टू – डू लिस्टमध्ये सामिल आहे. मला माहिती आहे उशीर झाला आहे. पण मी लग्न नक्की करणार आहे…’ एवढंच नाही तर, कुटुंबियांकडून लग्नासाठी प्रचंड दबाव आहे, पण प्रत्येक गोष्ट घडण्यासाठी त्याची एक ठरलेली वेळ असते…
लिव्हइन रिलेशनशिपवर मोठं वक्तव्य
‘लग्न आयुष्यात घडणारी प्रचंड चांगली गोष्ट आहे… पण आजची पिढी लिव्हइन रिलेशनशिपमध्ये जास्त विश्वास ठेवते. महिलांच्या हितासाठी लिव्हइन रिलेशनशिप बिलकूल चांगली गोष्ट नाही… मी कधी लिव्हइन रिलेशनशिपमध्ये राहिली नाही… पण रिलेशनशिपमध्ये राहिली आहे…’
‘लिव्हइन रिलेशनशिपमध्ये राहण्याऱ्या तरुणी प्रेग्नेंट राहतात, त्यानंतर अबॉर्शन करावं लागतं… मला असं वाटतं की, लिव्हइन रिलेशनशिप महिलांसाठी योग्य नाही…’ सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त कंगना यांच्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे.
अर्चना पुरण सिंहच्या मोठ्या मुलाने आर्यमनने योगिता बिहानीसह केला साखरपुडा
अर्चना पुरण सिंगच्या आनंदाला सीमा नाही राहिली आहे कारण तिचा मोठा मुलगा आर्यमन सेठीने गर्लफ्रेंड आणि ‘द केरळ स्टोरी’ फेम योगिता बिहानीशी साखरपुडा केला आहे. या प्रसंगी अर्चनाच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. आर्यमन सेठी आणि योगिता यांनी नुकतेच एका व्लॉगमध्ये त्यांच्या नात्याची पुष्टी केली होती आणि आता दोघेही लग्नाच्या तयारीत आहेत. अचानक सरप्राईज देत आर्यमनने योगिताला लग्नाची मागणी घातली असल्याचे त्याच्या ब्लॉगमधून दिसून येत आहे.
आता अर्चना पुरण सिंगचा मुलगा आर्यमन त्याच्या गर्लफ्रेंडसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणार आहे. नवीनव्लॉगमध्ये, आर्यमन सेठीने पालक अर्चना पुरण सिंग आणि परमीत सेठी यांचे आशीर्वाद घेतले आणि नंतर योगिता बिहानीला प्रपोज केले. व्लॉगमध्ये, कुटुंबाने असेही सांगितले की आर्यमन आणि योगिता शेजारच्या घरात एकत्र राहतील. त्यांचे घर एका बागेद्वारे अर्चना-परमीतच्या घराशी जोडले जाईल.
नवीन घरात प्रवेश
व्हिडिओची सुरुवात आर्यमन सेठी आणि योगिता बिहानी यांनी केलेल्या घोषणेने झाली. ते म्हणाले, ‘आम्ही एकत्र राहण्याचा निर्णय घेतला आहे, त्या घरात. आम्ही खूप उत्साहित आहोत. आम्ही एकत्र जीवन जगण्याचा निर्णय घेतला आहे. ‘आम्ही मोठे झालो आहोत असे वाटते.’