७० च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री काळाच्या पडद्याआड, ६८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
हिंदी सिनेसृष्टीतून दु:खद बातमी समोर येत आहे. ७० च्या दशकातील सुंदर आणि बहुआयामी अभिनेत्री रिटा आंचन (Rita Anchan) यांचं निधन झालं आहे. रिटा आंचन यांची वयाच्या ६८ व्या वर्षी प्राणज्योत मालवली आहे. रिटा आंचन यांच्या निधनाचे वृत्त ऐकून इंडस्ट्रीतल्या अनेक दिग्गज मान्यवरांनी हळहळ व्यक्त केली आहे. त्यांनी आपल्या सिनेकरियरमध्ये, ७० च्या दशकांत हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केले आहे. रिटा आंचन यांना प्रेक्षकांमध्ये विशेष ओळख कन्नड चित्रपटांमधून मिळाली आहे.
रिटा आंचन यांनी दिवंगत अभिनेते लोंकेश यांच्यासोबत काम केले आहे. त्यांच्या अभिनयाला प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली आणि भरभरून प्रेमही दिले. रिटा आंचन यांची ‘पारसंगदा गेंडे थिम्मा’ या चित्रपटातली मारकानीची भूमिका प्रचंड गाजली होती. तिने हिंदी, पंजाबी, कन्नड आणि गुजरातीसह अनेक भाषांमध्ये काम केले आहे आणि प्रचंड लोकप्रियता मिळवली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, गेल्या अनेक दिवसांपासून रिटा शारीरिक व्याधींनी त्रस्त होत्या. त्यांच्यावर संबंधित उपचारही सुरु होते. रिटा यांच्या चाहत्यांनी आणि सिनेसृष्टीतील कलाकारांनी त्यांच्या दुःखद निधनाबद्दल हळहळ व्यक्त केली.
हे देखील वाचा- “दफन करून आलास ना त्याला…”, नवजात बाळाच्या मृत्यूविषयी बोलताना प्रसिद्ध गायक भावुक
दिग्दर्शक रघुराम डीपी यांनी अभिनेत्री रिटा आंचन यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करताना म्हणाले की, “तुमच्या सर्वांसोबत रिटा आंचन यांची जीवन कहाणी शेअर करण्याचे माझे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही. ‘पारसंगदा गेंडे थिम्मा’ या चित्रपटातील भूमिकेसाठी प्रसिद्ध असलेल्या श्रीमती रिटा आंचन राधाकृष्णा यांना कालच देवाज्ञा झाली. ईश्वर त्यांच्या कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो. रिटा यांनी ‘कोरा बदन’, ‘लड़की जवान हो गई’, ‘सुंदरभा’, ‘आप से प्यार हुआ’, ‘फर्ज’ आणि ‘प्यार’ या लोकप्रिय चित्रपटांमध्ये काम केलं. रिटा आंचन यांच्या खासगी लाईफबद्दल बोलायचे तर, रिटा यांनी राधाकृष्ण मंचिगैया यांच्यासोबत लग्न केलं. लग्नानंतर त्या बंगरुळुला स्थायिक झाल्या. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे.