दाक्षिणात्य अभिनेते डॅनियल बालाजी यांचं निधन (Daniel Balaji Passes Away) झालं आहे. शुक्रवार, 29 एप्रिल रोजी हृदयविकाराच्या झटक्यानं त्याचं निधन झालं. वयाच्या 48 व्या वर्षी त्याने या जगाचा निरोप घेतला. शुक्रवारी त्याच्या छातीत दुखू लागल्याने चेन्नईच्या कोटिवाकम येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं, तेथे उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालावली. त्याच्या निधनाच्या वृत्तानं साऊथ इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे.
[read_also content=”एनआयएनं रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोटातील दोन संशयितांचे फोटो केले प्रसिद्ध, 10 लाखांचे बक्षीस जाहीर! https://www.navarashtra.com/india/nia-re”]
डॅनियल बालाजीचं पार्थिव अंत्यसंस्कारासाठी पुरसाईवलकम येथील त्यांच्या निवासस्थानी नेण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आज, शनिवार, 30 मार्च रोजी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. 48 वर्षीय अभिनेत्याच्या निधनानं त्याच्या चाहत्यांना आणि तमिळ चित्रपटसृष्टीतील लोकांना मोठा धक्का बसला आहे. आज इंडस्ट्रीतील लोक त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी येणार आहेत.