चित्रपट निर्माती किरण राव दिग्दर्शित ‘लापता लेडीज’ चित्रपटाचा टीझर रिलीज झालायं. पुढील वर्षी ३ मार्चला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणारे. ‘धोबी घाट’ रिलीज होऊन ११ वर्षांनी किरण राव दिग्दर्शनाच्या दुनियेत परतत आहे. या चित्रपटात अभिनेता रवी किशन पोलीस इन्स्पेक्टरच्या भूमिकेत दिसत असल्याचे टीझरमध्ये पाहायला मिळत आहे. ‘मिसिंग लेडीज’ चित्रपटाचा सारांश असा आहे की, ‘जेव्हा दोन तरुण नववधू ट्रेनमधून हरवतात, तेव्हा जो गोंधळ उडतो तो मजेदार असतो. एखाद्या चुकीमुळे असा प्रवास सुरू होतो ज्याची कोणालाही अपेक्षा नसते.
टीझर पहा-