सौजन्य- सोनाक्षी सिन्हा इन्स्टाग्राम
बॉलिवुड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने आणि अभिनेता झहीर इकबालने जून महिन्यात कोर्ट मॅरेज केलं. त्यानंतर अभिनेत्रीला ट्रोलिंगचा सामना करावा लागला. सोनाक्षी आणि झहीरने ज्या घरात कोर्ट मॅरेज केलं ते घर विकणार आहे, अशी सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. नेमकं ते घर सोनाक्षीने का विकण्याचा निर्णय का घेतला ? यामागचे कारण समोर आले आहे.
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाला सर्वाधिक प्रसिद्धी ‘हिरामंडी’ वेब सीरिज मधून मिळाली आहे. शिवाय तिच्या अभिनयाचंही चाहत्यांनी तोंडभरून कौतुक केलं. सोनाक्षी आणि झहीरने ज्या घरात लग्न केलं ते घर सोनाक्षीच्या मालकीचं होतं. सोनाक्षीचं हे पहिलं घर असल्यामुळे ते तिच्यासाठी खूप खास होतं. वांद्रामध्ये सीफेसींग असणारं घर अभिनेत्री २५ कोटींमध्ये विकत आहे.
विश्वसनीय सुत्रांनी दिलेल्या वृत्तानुसार, अभिनेत्रीने नवीन घर खरेदी केले आहे. त्यामुळे लवकरच ती या नव्या घरात शिफ्ट होण्याची शक्यता आहे. सोनाक्षीचे सासरे सुप्रसिद्ध बिल्डर असून त्यांचा स्वत:चा ज्वेलरीचा बिझनेसही आहे. त्यांनी तयार केलेल्या बिल्डिंगमध्येच नवा अलिशान फ्लॅट खरेदी केला आहे.
गेल्या वर्षी (२०२३ मध्ये) अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत नवीन घर खरेदी करणार असं सांगितलं होतं. नुकतंच हिंदुस्थान टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, अभिनेत्रीने मार्च २०२० मध्ये एक अलिशान प्लॉट खरेदी केला होता. सप्टेंबर २०२३ मध्ये त्याच बिल्डिंगीमध्ये ११ कोटींमध्ये आणखी एक अलिशान प्लॉट खरेदी केलेला आहे. अभिनेत्रीने ती सर्व प्रॉपर्टी स्वत: खरेदी केलेली होती. वडिलांसाठी तिने प्रॉपर्टी खरेदी केल्याचे एका मुलाखतीमध्ये सांगितले होते. तिच्या सर्व कमाईमधून खरेदी केलेले ते घर असल्यामुळे तिच्यासाठी आणि सिन्हा कुटुंबीयांसाठी ते घर खूप खास असणार आहे. त्या घरांमध्ये सिन्हा कुटुंबीयांच्या अनेक आठवणी आहेत.
हे देखील वाचा – रितेश देशमुख ‘पुढारी’ घनश्यामवर कडाडला, म्हणाला, ‘यापुढे मी तुमच्याशी…’
गेल्या काही दिवसांपासूनच सोशल मीडियावर सोनाक्षी बांद्रातील घर विकणार अशी चर्चा सुरू आहे. पण अद्याप सिन्हा कुटुंबीयांनी किंवा सोनाक्षीने याबद्दल कोणतेही विधान केलेले नाही. सोनाक्षी आणि झहीरच्या लग्नाला दोन महिने झाले आहेत. दोघांनीही लग्नाचा वाढदिवस अगदी थाटामाटत सेलिब्रेट केला आहे. दोघेही लग्नानंतरचे आयुष्य जोरदार सेलिब्रेट करीत आहेत.