शतकानुशतके भारतीय स्वयंपाकघरात डाळी, आमटी किंवा भाज्यांना फोडणी देण्यासाठी हिंगाचा वापर केला जातो. हिंगाच्या वापरामुळे अन्नाचा सुगंध आणि चव वाढण्यास मदत होते. जेवणात हिंगाचा वापर केल्यास खाल्लेले अन्नपदार्थ सहज पचन होतात आणि पचनक्रिया सुधारते. धावपळीच्या जीवनशैलीमुळे, बैठी जीवनशैलीमुळे आणि अस्वास्थ्यकर खाण्याच्या सवयींमुळे लठ्ठपणा, गॅस आणि अपचन, वजन वाढणे इत्यादी अनेक समस्या वाढून आरोग्य बिघडून जाते. आयुर्वेदात वात दोष संतुलित करण्यासाठी हिंगाचा वापर केला जातो. चला तर जाणून घेऊया हिंगाचे सेवन करण्याचे फायदे. (फोटो सौजन्य – istock)
वजन कमी करण्यापासून ते आम्लपित्तापासून आराम मिळण्यापर्यंत…! चिमूटभर हिंगाचे 'या' पद्धतीने करा सेवन

रात्रीच्या जेवणानंतर बऱ्याचदा पोट फुगल्यासारखे वाटते किंवा पोटात जडपणा जाणवण्याची जास्त शक्यता असते. अशावेळी कोमट पाण्यात चिमूटभर हिंग टाकून प्यायल्यास पोटातील गॅस बाहेर पडून जाईल.

हिंगात दाहक-विरोधी आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म पोटात वाढलेली सूज कमी होण्यास मदत होते. गॅस, आम्लपित्त, पोटदुखी आणि बद्धकोष्ठता यांसारख्या सर्व समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी हिंग खावे.

शरीरावर वाढलेली चरबी झपाट्याने कमी करण्यासाठी उपाशी पोटी कोमट पाण्यात हिंग मिक्स करून प्यावे. यामुळे पोटावर वाढलेला चरबीचा घेर कमी होतो आणि तुम्ही स्लिम दिसता.

वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे सर्दी, खोकला किंवा इतर साथीच्या आजारांची लागण होते. त्यामुळे हिंगाचे सेवन केल्यास आजारांपासून शरीराचा बचाव होईल. हिंगामध्ये उत्कृष्ट जीवाणूनाशक, विषाणूनाशक आणि दाहशामक गुणधर्म असतात.

हृदयाच्या आरोग्यासाठी हिंग खूप जास्त फायदेशीर आहे. खराब कोलेस्ट्रॉल नष्ट करण्यासाठी हिंग प्रभावी ठरते.






