गणेशचतुर्थी निमित्त घरोघरी बाप्पाचे आगमन पार पडले आहे. दोन वर्षांनंतर गणेशोत्सव साजरा होत असल्याने सर्वसामान्यांप्रमाणेच सेलिब्रिटींच्या घरचा बाप्पा देखील यंदा खूपच खास आहे.
बॉलिवूड आणि मराठी चित्रपट सृष्टीतील स्टार अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) याच्या मुंबई येथील घरी काळ गणरायाचे आगमन झाले. यावेळी रितेश देशमुख सह त्याचे संपूर्ण कुटुंब यावेळी उपस्थित होते.
रितेश देशमुखच्या वरळी येथील घरी गणरायाची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली असून यावेळी रितेश देशमुखचे मोठे बंधू माजी मंत्री आणि आमदार अमित देशमुख (Amit Deshmukh) त्यांची पत्नी अदिती देशमुख, लहान भाऊ धीरज देशमुख त्यांची पत्नी दीपशिखा देशमुख, जेनेलिया देशमुख (Genelia deshmukh)आणि त्यांची मुले रियान आणि राहील उपस्थित होते. पूर्ण देशमुख कुटुंबीय यावेळी गणरायाची पूजा करताना पाहायला मिळाले.
रितेश देशमुख आणि पत्नी जेनेलिया या दोघांनी सोशल मीडियावर फोटो शेअर करून चाहत्यांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.