मंत्री संजय शिरसाट यांनी सरकारी पैशांबाबत वादग्रस्त विधान केल्यामुळे आमदार रोहित पवार आक्रमक झाले आहे (फोटो - सोशल मीडिया)
आमदार रोहित पवार यांनी महायुतीच्या अनेक नेत्यांच्या धक्कादायक व्हिडिओ समोर आणल्या आहेत. माणिकराव कोकाटे यांच्या विधीमंडळाच्या सभागृहामध्ये जंगली रमी खेळताना देखील रोहित पवार यांनी व्हिडिओ शेअर केला होता. आता मात्र रोहित पवार यांनी शिंदे गटाचे नेते आणि मंत्री संजय शिरसाठ यांचा नवा व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये संजय शिरसाट हे एका व्यासपीठावरुन बोलत असून यावेळी त्यांनी कोट्यवधी रुपयांच्या गोष्टी केल्या आहेत. आपल्या बापाचा पैसा आहे का? असे म्हणत मंत्रीमहोदयांनी वक्तव्य केले आहे. यावरुन रोहित पवार यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
अकोल्यातील एका कार्यक्रमात शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट हे सहभागी झाले होते. यावेळी मंचावरुन बोलताना त्यांनी अनेक विधाने केली. यावेळी त्यांच्यासोबत मंचावर भाजपा आमदार हरीश पिंपळे, राष्ट्रवादी आमदार अमोल मिटकरी, कॉंग्रेसचे साजिद खान पठाण उपस्थित होते. यावेळी संजय शिरसाट म्हणाले की, मी प्रत्येक आमदाराला विनंती करतो आहे तुम्ही माझ्याकडे या. वसतिगृहासाठी पाच कोटी… दहा कोटी किंवा पंधरा कोटी कितीही महाग वसतिगृह असेल मागा… नाही दिलं तर संजय शिरसाट नाव नाही. महागाई लगेच मंजूर करू, आपल्या बापाचं चाललंय का? सरकारचा पैसा आहे. कसा वापरचा याची अक्कल ठेवायची बाकी काय करायचं आहे? असे वक्तव्य संजय शिरसाट यांनी केले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये पुन्हा एकदा त्यांच्य वक्तव्याने चर्चांना उधाण आले आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते व आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर मंत्री संजय शिरसाट यांचा व्हिडिओ शेअर केला आहे. यावर रोहित पवार यांनी लिहिले आहे की, “मा. शिरसाठ साहेब, पैसा तुमच्या घरचा नसला तरी निवडणुकीच्यावेळी ज्यांना तुम्ही #मायबाप म्हणता त्या ‘माय’ आणि ‘बाप’ जनतेचा तर आहे ना! या पैशाचा उपयोग करणारे तुम्ही फक्त तात्पुरते विश्वस्त आहात. त्यामुळं सरकारचा पैसा आपल्या घरचा नाही म्हणून कशीही उधळपट्टी करण्याचा किंवा ‘बॅगा भरण्याचा’ अधिकार कुणालाही नाही,” असा टोला आमदार रोहित पवार यांनी लगावला आहे.
मा. शिरसाठ साहेब, पैसा तुमच्या घरचा नसला तरी निवडणुकीच्यावेळी ज्यांना तुम्ही #मायबाप म्हणता त्या ‘माय’ आणि ‘बाप’ जनतेचा तर आहे ना! या पैशाचा उपयोग करणारे तुम्ही फक्त तात्पुरते विश्वस्त आहात. त्यामुळं सरकारचा पैसा आपल्या घरचा नाही म्हणून कशीही उधळपट्टी करण्याचा किंवा ‘बॅगा… pic.twitter.com/LeDlHUPgvV — Rohit Pawar (@RRPSpeaks) August 3, 2025






