कंधार नगरपरिषद निवडणूक 2025 साठी उमेदवारांचे अर्ज दाखल झाले आहे (फोटो - सोशल मीडिया)
Maharashtra Local Body Elections : कंधार : नगरपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल केल्यानंतर शहरात मतदारांच्या गाठीभेटी, संवाद, संपर्क केला जात आहे. परंतु कोणता उमेदवार आपल्या विजयात अडसर ठरतो. याचे राजकीय गणित मांडून उमेदवारी परत घेण्याची विनवणी करण्यात आली. त्यात काही जणांना यश आले. परंतु काहींचा अपेक्षाभंग झाला. छाननीतील वैध असलेल्या काही जणांनी आपली उमेदवारी मागे घेतली. त्यातील १ नगराध्यक्ष व १९ नगरसेवकांचे अशा २० जणांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. त्यामुळे व नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठीचे लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. परंतु उमेदवारी परत घेतलेल्याचा राजकीय फायदा कोणाला मिळणार? याची आकडेमोड राजकीय वर्तुळात केली जात आहे.
नगरपरिषद निवडणुकीसाठी अनेक इच्छुक गत काही दिवसापासून तयारी करत होते. नगरसेवक पदाची उमेदवारी न
मिळविण्यासाठी कार्यकर्त्यांनी आपल्या पक्षाला प्राधान्य दिले. त्यात अनेकांना यश आले असले तरी काहींचा भ्रमनिरास झाला. पक्षाची उमेदवारी मिळाली नसल्यान अन्य पक्षाकडून ऐनवेळी उमेदवारी घेऊन काही जण निवडणूक रिंगणात उतरले आहेत. काहींना तर अपक्ष राहण्याचा प्रसंग ओढवला. अशा उमेदवारीमुळे पक्षाचे अ आपल्या मतांचे ध्रुवीकरण टाळण्यासाठ उमेदवारी परत घेण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. त्यात अनेकांना यश आले. तन काहींना यश आले नाही.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
अटीतटीच्या लढती
उमेदवारी अर्ज परत घेण्याचा शेवटचा दिवस हा २१ नोव्हेंबर होता, त्यात नगराध्यक्ष पदासाठी १ आणि नगरसेवक पदासाठी १९ जणांनी उमेदवारी अर्ज परत घेऊन पक्ष व स्वतः चे राजकीय हित समोर ठेवून निवडणूक रिंगणाच्या बाहेर जाणे पसंद केले. एकूण १० प्रभागातून २० नगरसेवक पदासाठी लढत होणार आहे. २० नगरसेवक पदासाठी १० प्रभागातून ६९ जण आपले राजकीय नशीब आजमावत आहेत. एकूण दहा प्रभागातील लढतीचे राजकीय चित्र स्पष्ट झाले आहे. एकूण १० प्रभागात कुठे दुरंगी, तिरंगी, चौरंगी व पंचरंगी लढती होणार आहेत.
प्रभाग २ व मध्ये अटीतटीची सरळ लढत दोन उमेदवारात होत आहे प्रभाग ५ व मध्ये सुद्धा दोनच उमेदवार आमने सामने आले आहेत प्रभाग ७ अ मध्ये सुद्धा सरळ लढत होत आहे. या ठिकाणी होत असलेल्या सरळ लढतीत उमेदवारांच्या राजकीय कौशल्य, लोकप्रियता, संपर्क व संवादाचा कस लागणार आहे तसेच पक्षीय नेतृत्वाचे कोणाला राजकीय बळ मिळते. यावर येथील विजयाचे गणित अवलंबून राहणार आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
नगरसेवक पदाच्या लढतीतून १९ जणांची माघार
नगरसेवक पदाच्या लढतीतून आपली उमेदवारी १९ जणांनी मागे घेतली. त्यामुळे त्या प्रभागातील लढतीचे राजकीय गणित कोणासाठी तारक आणि कोणासाठी मारक ठरते. हा एक औत्सुक्याचा विषय ठरणार आहे. गत अनेक वर्षांपासून त्या प्रभागात वाढवलेला संपर्क व संवाद, समस्या सोडविण्यासाठी घेतलेल्या पुढाकाराने प्रभागात वेगळा ठसा उमटविला होता. प्रभागात चांगली राजकीय मशागत करून ऐनवेळी उमेदवारी अर्ज मागे घेतली. त्यातील प्रभाग १ अ मधील कानिंदे चंद्रप्रभा, प्रभाग ९ ब मधील ज्योती पंढरे व अर्चना भालेराव, प्रभाग १० ब मधील पांडुरंग मामडे, अमोल उमरजकर आदीसह इतर सर्व परत घेतलेल्या उमेदवाराचा समावेश आहे.
भालेराव व मामडे यांचे राजकीय बळ कोणाला?
प्रभाग ९ ब मधून अर्चना भालेराव यांनी आपली उमेदवारी मागे घेतली. त यांचे पती पत्रकार माधवराव भालेराव यांनी या प्रभागात गत काही वर्षांपासून राजकीय मशागत केली होती. उत्तम संपर्क, वेळोवेळी सहकार्यासाठी तत्परता, संवादातून जोडलेला माणूसकीचा गोतावळा निर्माण केला होता. परंतु बदलत्या राजकारणात निवडणूक लढविण्यासाठी लागणारी राजकीय रसद अपूरी असल्याने उमेदवारी मागे घेतली. त्यामुळे त्यांनी निर्माण केलेले राजकीय वलय आता कोणाच्या बाजूने जाणार? आणि कोणाचा विजय होणार? याची उत्सुकता लागली आहे.






