File Photo : Abhijeet Patil
पंढरपूर : मुंबई येथील तीन दिवसीय विधिमंडळाच्या अधिवेशनानंतर माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिजीत पाटील यांनी स्वराज्याची राजधानी गाठली आणि छत्रपतींच्या गादीसमोर नतमस्तक झाले. निवडून आल्यानंतर रायगडावर जाणारे राज्यातील पहिले आमदार अभिजीत पाटील हे आहेत.
हेदेखील वाचा : Kurla best bus service: कुर्ल्यातील बेस्ट बस सेवा आजही बंदच, प्रवाशांची पायपीट; प्रवासासाठी ‘या’ मार्गांचा वापर करा
रायगडाच्या पावनस्थळावर छत्रपतींचा राज्याभिषेक झाला होता. याच ठिकाणी स्वराज्याचा संकल्प पूर्ण केला होता. या ठिकाणी छत्रपतींचे अनेक वर्ष वास्तव होते. या पवित्र ठिकाणी जाऊन आमदार अभिजीत पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घेतले. यावेळी अभिजीत पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, ‘छत्रपतींनी हजारो मावळे घडवले आणि स्वराज्याची संकल्पना रुजवली. त्यांच्या प्रेरणेने पुढील पिढ्या घडल्या मराठा साम्राज्याने बलाढ्य शक्तींना परास्त करत अटकेपार झेंडा रोवला. संपूर्ण महाराष्ट्र स्वराज्याच्या आदर्श संकल्पनांवर उभा राहिला आहे’.
दरम्यान, मला देखील माढा विधानसभेची मिळालेली जबाबदारी एक मावळा म्हणून पूर्ण करायची आहे. असा संकल्प करून आमदार अभिजीत पाटील यांनी छत्रपती शिवरायांच्या चरणी अर्पण करून आशीर्वाद घेतल्याच्या भावना व्यक्त केल्या.
माढा मतदारसंघात या परिवर्तनाची सुरुवात
माढा मतदारसंघात या परिवर्तनाची सुरुवात छत्रपतींच्या स्मारकाने होणार आहे. माढा मतदारसंघात छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकही अश्वारूढ पुतळा नाही, ही खंत कोणाच्याही मनात राहू देणार नाही, असा विश्वास दिला. आमदार अभिजीत पाटील यांनी रायगडावर छत्रपतींचे दर्शन घेतल्यानंतर स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडाचा इतिहास जाणून घेतला.
संभाजीराजेही रायगडावर
महाराजांचे वंशज संभाजीराजे छत्रपती हे देखील योगायोगाने रायगडावर आले होते. यावेळी अभिजीत पाटील यांनी त्यांची आवर्जून भेट घेतली. तसेच रायगडावर सुरू असलेल्या संवर्धनकार्याबाबत चर्चा केली. कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक झालेली भेट आनंददायी ठरल्याच्या भावना आमदार पाटील यांनी व्यक्त केली.
अचानक झाली भेट
याप्रसंगी त्यांचे रायगड दर्शन सुरू असताना एका ठिकाणी शाळेतील विद्यार्थी इतिहास जाणून घेत असताना त्यांना दिसले. त्यामधील एका शिक्षकाने आमदार अभिजीत पाटील यांना ओळखले आणि संवाद साधला. यावेळी त्यांनी विद्यार्थी आणि योगायोगाने भेट झालेले स्वराज्याचे वंशज यांच्याशी संवाद साधता आल्याचा आनंद व्यक्त केला.
हेदेखील वाचा : Mahavikas Aghadi News: EVM विरोधातील लढाई तीव्र होणार; महाविकास आघाडीचा मोठा निर्णय