बिहारमध्ये फडणवीसांचा जलवा (फोटो- सोशल मीडिया)
बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएला स्पष्ट बहुमत
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलेला बिहारमध्ये प्रचार
महाआघाडीचा बिहारमध्ये दणदणीत पराभव
Bihar Vidhan Sabha Election Result 2025 Live: बिहार विधानसभा निवडणुकीचा आज निकाल जाहीर झाला आहे. पहिल्या कलांमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत मिळतंय दिसून येत आहे. बिहारमध्ये एनडीएला 201 जागा मिळाल्या आहेत. तर महागठबंधनला केवळ 36 जागा मिळाल्या आहेत. दरम्यान बिहारमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची क्रेझ देखील पाहायला मिळाली आहे. बिहारमध्ये महाआघाडीचे पानीपत झाले आहे.
बिहारमध्ये एनडीएला बहुमत मिळाले आहे. एनडीएने बिहारचा गड राखला आहे. दरम्यान भाजपने बिहारसाठी स्टार प्रचारक घोषित केले होते. या यादीमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे देखील नाव होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बिहारमधील अनेक मतदारसंघात प्रचार केला होता.
देवेंद्र फडणवीस यांनी प्रचार केलेल्या मतदारसंघात एनडीएला फायदा होताना दिसून येत आहे. एनडीएचे अनेक उमेदवार आघाडीवर आहेत. त्यामुळे जवळपास त्यांचा विजय निश्चित समजला जात आहे. देवेंद्र फडणवीस यांनी 61 मतदारसंघात जाऊन प्रचार केला होता. त्यापइकी जवळपास 40 ते 50 मतदारसंघात एनडीएच्या उमेदवारांना फायदा होताना दिसून येत आहे,
सारन, सीवान, पाटणा, सहरसा , समस्तीपुर, खगडिया आणि अन्य मतदारसंघात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रचारसभा घेतल्या होत्या. देवेंद्र फडणवीस यांनी ज्या मतदारसंघात प्रचार केला होता, त्या मतदारसंघात एनडीएचे उमेदवार आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे.
बिहारच्या निकालावरुन महाविकास आघाडीमध्ये जुंपली
संपूर्ण देशाचे लक्ष बिहार विधानसभा निवडणुकीकडे लागले आहे. जोरदार प्रचार आणि टीका यानंतर दोन टप्प्यामध्ये मतदान पार पडले. यानंतर आता बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल आज (दि.14) लागणार आहे. त्यासाठी सकाळपासून मतमोजणी सुरु असून यामध्ये सध्या तरी भाजपची असलेली NDA आघाडी ही प्रचंड मतांनी आघाडीवर आहे. यावर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया समोर येत आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनीच कॉंग्रेसवर जोरदार निशाणा साधला आहे.
बिहारमध्ये कॉंग्रेसच्या प्रचारानंतर आणि जोरदार आश्वासनांनंतर पिछाडीवर असल्याचे चित्र आहे. बिहारच्या विधानसभा निवडणुकीवरुन महाराष्ट्राच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा अंदाज लावला जात आहे. या निकालावरुन महाविकास आघाडीमधील शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अंबादास दानवे यांनी कॉंग्रेसवर जोरदार निशाणा साधला.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी कॉंग्रेसला घरचा आहेर दिला. अंबादास दानवे म्हणाले की, पराभव झालेला मान्य आहे. भाजपने सत्तेचा गैरवापर केलाय. तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घोषित करायला वेळ लावला. त्यामुळं खूप उशीर झाला. काँग्रेस आणि आरजेडीने चुका केल्या. मतदार यादीत घोळ कायम आहेच. काँग्रेस जागावाटपामध्ये मोठा वाटा मागते. विजयाचे गणित आले की मोठा पराभव होतो, हे माझं मत स्पष्ट आहे. यामुळं नुकसान होते, अशा शब्दांत दानवे यांनी नाराजी व्यक्त केली.






