गुणरत्न सदावर्ते यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीवर निशाणा साधला आहे (फोटो - सोशल मीडिया)
वकील गुणरत्न सदावर्ते यांनी माध्यमांशी संवाद साधून राजकीय विषयांवर भाष्य केले आहे. गुणरत्न सदावर्ते यांनी ठाकरे बंधूंच्या युतीवर टीका केली त्याचबरोबर राज ठाकरेंनी मर्यादांचे उल्लंघन करू नये असा इशारा देखील दिला. गुणरत्न सदावर्ते म्हणाले की, “महाराष्ट्र डिस्टर्ब करण्याच्या दृष्टीने काही वक्तव्य करत आहेत. अशी भाषण करणारी दोघेजण म्हणजे राज ठाकरे आणि असदुद्दीन ओवैसी. हे दोघे एकाच विचाराचे औलादी आहेत का ? या दोघांमध्ये साम्य आहे. ते साम्य म्हणजे हे दोघे अशा प्रकारे बाहेर येतात जसे जून महिना पावसाळ्याचा असतो आणि पावसाळ्यामध्ये शेतकरी यांना आवाज येत असतो तो बेंडकुळेचा असतो. निवडणुका आल्या की हे दोन बेंडकुळे आवाज करतात,” अशा शब्दांत गुणरत्न सदावर्ते यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
हे देखील वाचा : अजित पवारांनी ओवैसींना झापले! हिजाबच्या राजकारणावरून ओवैसींवर निशाणा, म्हणाले – “फालतू विधानांपेक्षा…..”
पुढे गुणरत्न सदावर्ते म्हणाले की, “गौतमी पाटील यांच्या नृत्यावर सुद्धा लोक शिट्या वाजवतात आणि आनंद व्यक्त करतात. माज शब्द वापरणारे लोक चालतात का ही लोकतंत्र मधली भाषा आहे का? राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची नय्या डुबती आहे. मुंबईतील अनेक मोठे व्यवसाय दूर जात आहेत आणि याचे कारण ही लोक आहेत. उद्योजकांनी उद्योग वाढवले तर राज ठाकरेंच्या घरी परवानगीला पाठवायचे का? राज ठाकरेंना मर्यादा आहे त्यांनी त्याचे उल्लंघन करू नये. अदानीसोबत तुम्ही कौटुंबिक फोटो काढता तेव्हा चालतं. यांची भाषण आणि सभा या केवळ एन्टरटेन्मेंटसाठी सुरू आहेत. एकतरी उमेदवार निवडून येतील असा अंदाज आहे का?” असा खोचक सवाल गुणरत्न सदावर्ते यांनी उपस्थित केला.
महापौर हा हिंदू आणि भारतीय जनता पार्टीचा होणार – सदावर्ते
पुढे ते म्हणाले की, “ठाकरे बंधूंचा सुफडासाफ झाला आहे. मुंबईच्या बाहेर सभा घेण्यासाठी जात नाहीत. राज ठाकरेंचे समर्थन करणारे काल किती डेसिमल होता स्पीकर हे प्रदूषणाचा भाग नाही ? खासदार अन्नामलाई यांच्या बाबत वक्तव्य केले ते शहराला कलंकित भाषा आहे. तुम्ही जर उत्तरं दिलं नाही तर कायदेशीर उत्तर घेऊ. अण्णा ये मुंबई है तुम्हाला तुमचे म्हणणे मांडण्यापासून कोणी रोकू शकणार नाही राज ठाकरे पण रोखू शकत नाहीत. उत्तर भारतीय महापौर बनवण्यापासून राज ठाकरे रोखू शकत नाही. महापौर हा हिंदू आणि भारतीय जनता पार्टीचा होणार,” असा विश्वास सुद्धा गुणरत्न सदावर्ते यांनी व्यक्त केला आहे आणि राज ठाकरेंना डिवचलं आहे.
हे देखील वाचा : “हिंमत असल्यास हात-पाय तोडून…”; के. अण्णामलई यांचे ठाकरेंना प्रत्युत्तर
“नालायक भाषा राज ठाकरेंनी आता थांबवावी. सोशल मीडिया पाहणाऱ्या सायबर सेलला आव्हान करत आहेत. सर्वोच्च न्यायालयाने दोन भाषेमध्ये प्रांतीय वाद निर्माण करणे असे वर्तन आहे, त्यामुळे त्यांच्यावर याचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. राज ठाकरे खासदार होऊ शकत नाही, तुम्हाला किती वोट मिळू शकतात? ही निवडणूक म्हणजे त्यांचा शेवटीचा राजकीय श्वास आहे आम्ही त्यांची निंदा करत आहोत,” असा टोला देखील गुणरत्न सदावर्ते यांनी लगावला.
ओवैसी याने नथुराम गोडसे यांच्या विचारांची माफी मागितली पाहिजे
गुणरत्न सदावर्ते यांनी असदुद्दीन ओवैसी यांच्यांवर देखील निशाणा साधला आहे. पुढे ते म्हणाले की, “आज या देशामध्ये मुगल शासन नाही आहे. या देशाला अखंड भारताचे मार्गदर्शन असलेले पंडित नथुराम गोडसे यांच्या बाबत खालच्या स्तराची टीका केली. छोटा मोठा अँक्टर आहे तो कधीतरी बाहेर पडणारा. या देशामध्ये कोणतेही इस्लामिक राज्यांचे राज्य नाही संविधानिक राज्य आहे. ओवैसी याने नथुराम गोडसे यांच्या विचारांची माफी मागितली पाहिजे . देशाच्या प्रत्येक भागावर प्रत्येकाचा अधिकार आहे. राज ठाकरे यांचे कार्य झीरो आहे आणि ते झीरोचे हिरो आहेत. माझ्या बोलण्याचे परिणाम १०० टक्के होतात,” असे देखील गुणरत्न सदावर्ते म्हणाले आहेत.






