MBMC चा निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप? कठोर कारवाईची काँग्रेसकडून मागणी
चुकीचे वार्ड वाटप, हजारो दुबार नावे आणि प्रशासनिक त्रुटींमुळे बनावट मतदानाचा धोका वाढल्याची भीती आहे. संबंधित फॉर्म रद्द करून योग्य दस्तऐवजांच्या आधारेच पडताळणी करण्यात यावी आणि बेकायदेशीर फोन तात्काळ थांबवावेत, अशी मागणी निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे. याबाबत त्यांनी पुढील प्रमाणे सूचना व सुधारणा करणाऱ्या अशी मागणी केली आहे.
1. Appendix-1 त्वरित रद्द करून कायदेशीरदृष्ट्या पूर्ण फॉर्म जारी करावा
2. सर्व प्रकरणे फक्त फॉर्म 6/7/8, आवश्यक दस्तऐवज व BLO पडताळणीद्वारेच निकाली काढावीत
3. नागरिकांना येणारे बेकायदेशीर फोन तत्काळ थांबवावेत
4. अद्ययावत विधानसभा मतदारयादी तातडीने प्रसिद्ध करावी
5. संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करावी
दरम्यान मीरा-भाईंदर विधानसभा मतदारसंघातील गेल्या ३ निवडणुकांचा इतिहास पाहायला तर २००९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे गिल्बर्ट जॉन मेंडोका या जागेवरून विजयी झाले होते. त्यानंतर २०१४ च्या निवडणुकीत भाजपचे नरेंद्र मेहता विजयी झाले. २०१९ मध्ये विरोधी पक्षाच्या उमेदवार गीता जैन यांनी या मतदारसंघात विजय मिळवला. गेल्या ३ विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघांमध्ये मोठी राजकीय उलथापालथ झाली आहे. २०१९ च्या निवडणुकीत विरोधी पक्षाच्या उमेदवार गीता जैन आणि भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांचा पराभव केला होता.
तर एकेकाळी या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती. मात्र २०१४ च्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे आमदार गिल्बर्ट मेंडोन्सा यांचा पराभव झाला आणि त्यानंतर मतदारसंघातील राष्ट्रवादीची शक्ती कमी होऊ लागली. २०१४ मध्ये भाजपचे नरेंद्र मेहता यांनी या मतदारसंघात विजय मिळवला. त्यानंतर २०१७ मध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला. महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांसह सर्व नगरसेवकांनी भाजप आणि शिवसेनेत प्रवेश केला. येथील पक्षाचे प्रमुख नेते गिल्बर्ट यांनीही शिवसेनेत प्रवेश केला. अशात २०१९ साली झालेल्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार गीता जैन यांनी विजय मिळवाला. एकूणच गेल्या १५ वर्षात या मतदारसंघातील राजकारण अस्थिर असल्याचे दिसून येते.






