आज तुमचा अहंकार उद्ध्वस्त झाला... बीएमसी निकालांनंतर कंगना रनौतचा ठाकरेंवर प्रहार (Photo Credit- X)
बीएमसीच्या निकालात भाजप-शिंदे युतीने स्पष्ट बहुमत मिळवल्यानंतर कंगनाचा २०२० मधील एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. घर पाडल्यानंतर कंगना म्हणाली होती, “उद्धव ठाकरे, आज माझे घर तोडले आहे, उद्या तुमचा अहंकार तुटेल. हे काळाचे चक्र आहे.” आजच्या निकालांनी काळाचे हे चक्र पूर्ण झाले असल्याची भावना कंगनाने व्यक्त केली आहे.
In 2020, BMC demolished Kangana Ranaut’s house. Bombay HC called the BMC’s action illegal and malicious. Kangana said to Uddhav Thackeray – “My home was demolished today, your arrogance will crumble tomorrow”. Today, BJP has won BMC under Devendra Fadnavis.#DevaBhauDhurandhar pic.twitter.com/8d6NpbHSzj — Anshul Saxena (@AskAnshul) January 16, 2026
निवडणुकीतील महाविजयाबद्दल कंगनाने आनंद व्यक्त केला आहे. ‘एनडीटीव्ही’शी बोलताना ती म्हणाली, “मुंबईत आलेल्या या भगव्या लाटेबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप परिवाराचे अभिनंदन करते.” “हा निकाल म्हणजे केवळ राजकीय विजय नाही, तर माझ्यासारख्या कलाकाराला मिळालेला न्याय आहे. ज्यांनी मला शिवीगाळ केली आणि महाराष्ट्र सोडण्याची धमकी दिली, त्यांना जनतेने त्यांची जागा दाखवून दिली आहे.”
दशकांपासून शिवसेनेचा (UBT) बालेकिल्ला राहिलेली मुंबई महानगरपालिका आता महायुतीच्या ताब्यात आली आहे. भाजप सर्वात मोठा पक्ष ठरल्याने आणि शिंदे गटाच्या साथीने बहुमताचा आकडा गाठल्याने, आता मुंबईला भाजपचा महापौर मिळणार हे निश्चित झाले आहे. या विजयाने घराणेशाही आणि ‘महिलाविरोधी’ राजकारणाचा अंत झाल्याचा दावा कंगनाने केला आहे.
२०२० मध्ये पालघर साधू हत्या प्रकरण आणि सुशांत सिंह राजपूत मृत्यूनंतर कंगनाने तत्कालीन ठाकरे सरकारवर टीका केली होती. त्यानंतर बीएमसीने वांद्रे येथील कंगनाच्या घरावर अनधिकृत बांधकामाचा ठपका ठेवत कारवाई केली होती. तेव्हापासून कंगना आणि ठाकरे गटात संघर्ष सुरू होता, ज्याचा उल्लेख तिने आजच्या विजयानंतर आवर्जून केला.






