क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे (फोटो- सोशल मीडिया)
अटक वॉरंट निघताच कोकाटे यांची तब्येत बिघडली
नाशिक कोर्टाने कायम ठेवली शिक्षा
कोकाटे यांची मुंबई हायकोर्टात धाव
Manikrao Kokate: नाशिक जिल्हा न्यायालयाने मंत्री माणिकराव कोकाटे यांना सदनिका प्रकरणात सुनावण्यात आलेली शिक्षा कायम ठेवली आहे. त्यामुळे माणिकराव कोकाटे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. माणिकराव कोकाटे यांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे. तसेच तातडीने सुनावणी घेण्याची मागणी केली आहे. दरम्यान माणिकराव कोकाटे यांची तब्येत बिघडल्याची बातमी समोर येत आहे.
राज्याचे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. त्यांच्यावर अटकेची कारवाई होण्याची शक्यता असताना त्यांची तब्येत बिघडली असल्याचे समोर येत आहे. मुंबईतील एका रूग्णालयात ते उपचार घेत आसल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे आता माणिकराव कोकाटे यांच्या याचिकेवर हायकोर्ट काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागले आहे.
माणिकराव कोकाटे आजारी असल्याचे समोर आले आहे. मुंबईतील रूग्णालयात ते उपचार घेत असल्याचे समोर येत आहे. दरम्यान कोर्टाने त्यांना अटकेचे आदेश काढण्यात आले आहेत. तातडीने अटक करावी किंवा पोलिसांना शरण जावे असे आदेश देण्यात आले आहेत. २ वर्षांपेक्षा जास्तीची शिक्षा झाल्यास आमदारकी रद्द होते. त्यामुळे कोकाटे यांनी हायकोर्टात धाव घेतली आहे.
‘ये पॉलिटिक्स है बाबू भैया’! Manikrao Kokate संकटात अन् मुंडे कमबॅक करणार? थेट मंत्री होऊनच…
Manikrao Kokate संकटात अन् मुंडे कमबॅक करणार?
नाशिक कोर्टाने माणिकराव कोकाटे यांच्याविरध अटक वॉरट जारी केले आहे. नाशिक कोर्टाने माणिकराव कोकाटे यांची दोन वर्षांची शिक्षा कायम ठेवली आहे. त्यांचे मंत्रिपद आणि आमदारकी धोक्यात आली आहे. त्याच वेळेस माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे ही दिल्लीत असल्याच्या चर्चा सुरू आहेत.
Manikrao Kokate : कोकाटे कायद्यापेक्षा मोठे आहेत? आमदारकी रद्द करण्यासाठी रोहित पवार उतरले मैदानात
मुंबई हायकोर्टाने कोकाटे यांना दिलासा देण्यास नकार दिला तर त्यांचे मंत्रिपद जाण्याचा अंदाज आहे. कोकाटे यांच्यावर असलेली टांगती तलवार आणि धनंजय मुंडे यांचा दिल्ली दौरा यावर चर्चा सुरू आहे. कोकाटे यांचे मंत्रिपद गेल्यास धनंजय मुंडे यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार का? अशी चर्चा रंगू लागली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत कोकाटे यांच्याबाबत हायकोर्ट काय देणार याकडे सवरणाचे लक्ष लागले आहे. त्याच दरम्यान धनंजय मुंडे दिल्ली दौऱ्यावर असल्याचा चर्चा आहेत. त्यामुळे सरकारमध्ये मंत्री म्हणून धनंजय मुंडे कमबॅक करणार का अशी चर्चा रंगू लागली आहे.






