खासदार संजय राऊत यांनी मुंबईतील महापौर पदावरुन प्रतिक्रिया दिली आहे (फोटो - सोशल मीडिया)
देवाची इच्छा असेल तर आपला महापौर होऊ शकतो, असे वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केले. याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, “जे आकडे आहेत, ते जवळजवळ समसमान आहेत. चारचा फरक आहे. जगातला सर्वात मोठा पक्ष ज्याने महाराष्ट्रातला सर्वात मोठा पक्ष शिवसेना फोडून एक वेगळा गट निर्माण केला. प्रचंड ताकद आणि सत्तेचा वापर करून देखील त्यांना केवळ चारचे बहुमत मिळाले आहे. तुमचं बहुमत कितीही मोठं किंवा छोटं असू द्या, बहुमत हे चंचल असते,” असे त्यांनी म्हटले.
हे देखील वाचा : “…नाराजी खपवून घेतली जाणार नाही”; फडणवीसांचा नगरसेवकांना इशारा
पुढे महायुतीमधील राजकारणावर संजय राऊत म्हणाले की, “महायुतीचा महापौर बसला असता तर त्यांच्या सहकार्यांना असे 29 नगरसवेकांना कोंडून ठेवावे लागले नसते. जर इतकं सोप्प असतं तर 29 नगरसेवकांना राज्यातच कोंडून ठेवले नसते. यावर आमच्या देवाभाऊंचे काय म्हणणे आहे? नगरसेवकांचे अपहरण केले जाईल अशी भीती देवेंद्र फडणवीसांना आहे. आजही जे शिंदेंसोबत गेले आहेत त्यांच्या मनामध्ये धगधग आहे. मूळ शिवसैनिकांच्या मनात भाजपचा महापौर होऊ द्यायचा नाही असे असल्याचे आमच्या लक्षात आले आहे,” असे सूचक वक्तव्य खासदार राऊतांनी केले आहे.
हे देखील वाचा : : देवेंद्र फडणवीसांना मोठा धक्का? महापौरपदाबाबत शिंदेंनी टाकला डाव
पुढे खासदार राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत देखील प्रतिक्रिया दिली आहे. खासदार राऊत म्हणाले की, “एकनाथ शिंदे सोडले तर कोणालाच वाटणार नाही की महापौर हा भाजपचा व्हावा. एकनाथ शिंदे कोणत्या पदासाठी आग्रही आहेत हा त्यांचा प्रश्न आहे, ते अमित शाह यांच्याकडे जाऊन बोलतील, मात्र देवेंद्र फडणवीस ऐकतील असं वाटत नाही. एकनाथ शिंदेंना नगरसेवक फुटतील असे वाटते, त्यांना एवढी भीती आहे तर इथे कशाला ठेवले सुरतला घेऊन जायचे ना,” असा टोला देखील खासदार राऊत यांनी लगावला आहे.






