Abhijeet Dipke CJP Sambhajinagar Meeting : CJP ची पुढील रणनीती काय? संभाजीनगरमध्ये कोअर कमिटीची बैठक सुरू
या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आज 5 ऑगस्टला अभिजीत दिपके यांच्या संभाजीनगर येथील निवासस्थानी सीजेपीच्या कोअर कमिटीची बैठक होणार आहे. या बैठकीसाठी सीजेपी प्रवक्ते सौरभ दास, आशुतोष रांका यांच्यासह सीजेपीच्या कोअर कमिटीचे सदस्य संभाजीनगरला दाखल झाले आहे. मंगळवारी रात्री सर्वजण अभिजीत दिपके यांच्या निवासस्थानी दाखल झाल्याची माहिती आहे.
अभिजीत दिपके यांनी आपल्या पक्षाची महत्वाची बैठक छत्रपती संभाजीनगरमधील आपल्या घरी बोलावली. या बैठकीत पक्षाची पुढील दिशा ठरणार आहे. ध्येय धोरणेही स्पष्ट केली जाणार आहेत. E20 इंधनाच्या मुद्द्यात कॉकरोच जनता पार्टी उतरणार असल्याची चर्चा आहे. यावरही आजच्या बैठकीत चर्चा होणार आहेत. कॉकरोच जनता पार्टीचे काही सदस्य छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झाले. पुढील दोन दिवस या कोअर कमिटीची बैठक होणार आहे.
CJP च्या कोअर कमिटीच्या दोन दिवसीय बैठकीत आंदोलनाच्या पुढील रणनीतीवर चर्चा होणार आहे. सौरभ दास, आशुतोष रांका यांच्यासह काही प्रमुख पदाधिकारी बैठकीसाठी दाखल झाले आहे. ५ आणि ६ ऑगस्टचा सीजेपीच्या बैठकीत नक्की काय निर्णय होतो, याकडे आता राज्याच्या नजरा आहेत. सीजेपी राजकारणात प्रवेश करणार की चळवळ म्हणूनच काम करणार, हे पाहण महत्त्वाचे ठरणार आहे.
दरम्यान, सोशल मीडियावर सुरू झालेल्या सीजेपीच्या आंदोलनाला अवघ्या दोन महिन्यात मोठे यश मिळाले. सुरुवातील या आंदोलनाकडे कोणाचेही फारसे लक्ष नव्हते. पण ज्या दिवशी शिक्षण तज्ज्ञ सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी उचलून नेले आणि २० जुलैच्या संसद मोर्चात विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण झाली. या मारहाणीनंतर या आंदोलनाला वेगळे वळण मिळाले. देशभरातून विद्यार्थीच नव्हे तर पालक, ज्येष्ठ कलााकार, विरोधी पक्षांचे नेते देखील या आंदोलनाला पाठिंबा मिळू लागला.
सुरुवातीला अवघ्या २०० लोकांची गर्दी असणाऱ्या जंतरमंतरवर हजारोंनी विद्यार्थी दाखल झाले आणि शिक्षण व्यवस्था, परीक्षा प्रक्रियेत सुरु असलेल्या भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवू लागले. जंतर मंतरवर झालेल्या विद्यार्थ्यांच्या मारहाणीमुळे देशातील अनेक मोठ्या शहरांमध्येही विद्यार्थ्यांनी आंदोलने सुरू केली. अखेर विद्यार्थ्यांच्या वाढत्या दबावापुढे सरकारला झुकावे लागले आणि धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा म्हणजे हा सरकारला मोठा झटका मानला जातो.
जंतर मंतवरील आंदोलनादरम्यान अभिजीत दिपके यांना टायफाईडचे निदान झाले होते. टायफाईडवर उपचार घेतल्यानंतर अभिजीत दिपके छत्रपती संभाजीनगर येथील निवासस्थानी दाखल झाले. पण त्यानंतरही सीजेपीच्या भविष्याबाबत देशभरातून उत्सुकता निर्माण झाली आहे. त्यामुळे सीजेपीच्या भवितव्याबाबत या दोन दिवसात बैठक होणार आहे. खास बाब म्हणजे, देशातील एकही विरोधी पक्ष नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्याचा राजीनामा घेऊ शकला नाही. पण सीजेपीने अवघ्या दोन महिन्यात थेट केंद्रीय शिक्षण मंत्र्याचा राजीनामा घेतल्यामुळे सीजेपी पुढ काय कारणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
#WATCH | Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra | On Cockroach Janta Party Core Committee Meeting, party Chief Spokesperson Saurav Das says, “We were asked questions about where this movement will go after the success of the protest, and we have all come to strategise around the… pic.twitter.com/VhNbKoJaDI — ANI (@ANI) August 4, 2026






