पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर निशाणा (फोटो -ट्विटर)
बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीची घोषणा
दोन टप्प्यात होणार मतदान
पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर निशाणा
Bihar Elections 2025: बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली आहे. दोन टप्प्यात मतदान होणार आहे. तर एनडीए विरुद्ध महागठबंधन अशी लढत होणार आहे. प्रचाराला सुरूवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज बिहार दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी आरजेडी आणि विरोधकांवर निशाणा साधला आहे. पंतप्रधान मोदी आपल्या भाषणात नेमके काय म्हणाले आहेत, ते जाणून घेऊयात.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महागठबंधनच्या जाहिरनाम्यावर टीका केली आहे. मोदी म्हणाले, “महागठबंधनचा जाहीरनामामधील प्रत्येक घोषणेमागे खंडणी, लूट आणि भ्रष्टाचार हाच खरा हेतू असतो. बिहारमध्ये पुन्हा एनडीए सरकार येणार आहे. आमचे डबल इंजिन सरकार बिहारला विकसित करत आहे.”
मुझे विश्वास है कि बिहार के लोग RJD-कांग्रेस के झूठे वादों के झांसे में नहीं आने वाले हैं और एक बार फिर राज्य में NDA सरकार बनाएंगे। pic.twitter.com/XqRqCN1mwo — Narendra Modi (@narendramodi) October 30, 2025
पुढे बोलताना मोदी म्हणाले, “आरजेडी, कॉँग्रेस मतपेढीचे राजकारण, तुष्टीकरण, घुसखोरांना संरक्षण देण्याचे काम करते. घुसखोर त्यांच्यासाठी महत्वाचे आहेत. ते पूर्ण ताकदीने घुसखोरांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. हे लालटेनवाले, पंजा असणारे, कंदील असणारे इंडी आघाडीतील जे पक्ष आहेत ते, बिहारचा आणि बिहारच्या जनतेचा अपमान कसं काय करतात?”
बिहार जिंकण्यासाठी ‘तेजस्वी’ यादवांचा प्रण
महागठबंधनने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. याला संकल्प पत्र असे नाव देण्यात आले आहे. जाहीरनामा प्रसिद्ध करतेवेळेस महागठबांधनचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा तेजस्वी यादव आणि अन्य वरिष्ठ नेते उपस्थित होते. महागठबंधनने आधीच तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घोषित केला आहे. या संकल्प पत्राला ‘तेजस्वी प्रण’ असे नाव देण्यात आले आहे.
महागठबंधनने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. यामध्ये त्यांनी बिहारच्या जनतेला प्रत्येक परीवारातील सदस्याला नोकरी आणि 5 गुंठे जमीन देण्याची घोषणा करण्यात आली आहे. युवकाना रोजगार, नोकरी असे आश्वासन पूर्ण करण्याचे यामध्ये सांगण्यात आले आहे.
तेजस्वी यादव महाआघाडीचा मुख्यमंत्र्यांचा चेहरा
बिहार निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यापूर्वी जागावाटपाबाबत सुरू असलेल्या मतभेदांमध्ये, महाआघाडीने आज संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. महाआघाडीने तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून घोषित केले आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक गेहलोत यांनी महाआघाडी जिंकल्यास तेजस्वी यादव आणि मुकेश साहनी यांना मुख्यमंत्रीपदाचे आणि उपमुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून घोषित केले आहे.
बिहार निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यापूर्वी जागावाटपाबाबत सुरू असलेल्या मतभेदांमध्ये, महाआघाडीने आज संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. महाआघाडीने तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून घोषित केले आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक गेहलोत यांनी महाआघाडी जिंकल्यास तेजस्वी यादव आणि मुकेश साहनी यांना मुख्यमंत्रीपदाचे आणि उपमुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून घोषित केले आहे.






