काय घडलं नेमकं?
इरफात बेग असे जखमी झालेल्या दुचाकीस्वार तरुणाचे नाव आहे. इरफात हा आपल्या दुचाकीवरून मनमाड शहरातील चोपडा पेट्रोल पंपाजवळून जात होता. याच वेळी येवल्याच्या दिशेने सुसाट वेगाने जाणाऱ्या एका कारचा इरफातच्या दुचाकीला कट लागला. या गोष्टीचा जाब विचारण्यासाठी इरफातने कार चालकाला अडवले. मात्र, कार चालकाला याचा इतका राग आला की, त्याने कसलाही विचार न करता थेट चाकू काढला आणि इरफातच्या पोटात खुपसला.
पोलिसांनी बुधवार पेठेत तिघांना अडवले, प्रत्येकी 5 हजार मागितले अन्…; पुण्यातील धक्कादायक प्रकार
पोलिसांचा 25 किलोमीटर थरारक पाठलाग
इरफातवर चाकू हल्ला केल्यानंतर आरोपी कार चालक घटनास्थळावरून कारसह सुसाट वेगाने फरार झाला. घटनेची माहिती मिळताच मनमाड पोलिसांनी तत्काळ वायरलेसवरून मेसेज पाठवून संपूर्ण जिल्ह्यात नाकाबंदीचे आदेश दिले. आरोपी कारसह येवल्याच्या दिशेने पळून जात असताना पोलिसांनी तब्बल 25 किलोमीटरपर्यंत या कारचा थरारक पाठलाग केला.
पोलिसांच्या अंगावर घातली कार
मनमाड पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून येवला पोलिसांनी शहराजवळ नाकाबंदी करून आरोपीची कार अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, समोर पोलीस उभे असल्याचे पाहूनही मुजोर कार चालकाने कारचा वेग कमी करण्याऐवजी ती थेट पोलिसांच्या अंगावर घालण्याचा आणि त्यांना चिरडण्याचा प्रयत्न केला. परंतु, पोलिसांनी अत्यंत चाणाक्षपणे आणि जीवाची बाजी लावून बाजूला होत कारची नाकेबंदी केली आणि अखेर आरोपीला घेराव घालून बेड्या ठोकल्या.
आरोपी पोलिसांच्या ताब्यात; जखमी तरुण रुग्णालयात
पोलिसांनी अटक केलेल्या या मुजोर कार चालकाचे नाव लक्ष्मीकांत शेजवळ असे आहे. पोलिसांनी त्याची कार जप्त केली असून, त्याच्याविरोधात मनमाड पोलीस ठाण्यात विविध कलमांखाली गंभीर गुन्हा दाखल केला आहे. गंभीर जखमी झालेल्या तरुणाने स्थानिक रुग्णालयात हलवण्यात आले आहे. सध्या त्याच्यावर उपचार सुरु आहेत.
मध्यरात्री नवले पूल परिसरात ट्रक अडवला, चालकाला मारहाण केली अन्…; पुण्यातील धक्कादायक घटना






