माझ्या वडिलांची कारकीर्द आधी समजून घ्या: रोहिणी खडसे (फोटो - सोशल मीडिया)
जळगाव : राज्यामध्ये राजकारणी लोकांनी देखील मोठ्या उत्साहामध्ये होळीचा सण साजरा केला आहे. शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी देखील जळगावमध्ये होळी साजरी केली. त्याचबरोबर त्यांनी महायुतीच्या नेत्यांवर देखील जोरदार टोलेबाजी केली आहे. राज्यातील जनतेला होळी व धुलीवंदनाच्या शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर त्यांनी राज्यातील महिला सुरक्षेच्या प्रश्नावर प्रकाश टाकल आहे. याचबरोबर मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची छेड काढणारे आरोपी अद्याप फरार असल्यामुळे जोरदार हल्लाबोल केला आहे
शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसे म्हणाल्या की, “राज्य सरकारने राज्यातील महिलांच्या सुरक्षिततेकडे लक्ष द्यावं. महाराष्ट्रात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. अलीकडेच एक सर्वेक्षण झालं, ज्या सर्वेक्षणाच्या अहवालात असं म्हटलं आहे की आशिया खंडातील महिलांसाठीच्या सर्वात असुरक्षित देशांपैकी भारत एक आहे. या यादीत भारताची गणना होणं हे भारतासाठी खूपच दुर्दैवी आहे.” अशी टीका रोहिणी खडसे यांनी केली.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
त्याचबरोबर राज्यातील वाढत्या गुन्हेगारीवर देखील त्यांनी लक्ष्य केले आहे. रोहिणी खडसे म्हणाल्या की, “पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक राहिलेला नाही. गुन्हेगारांमध्ये कायद्याची भीती नाही. त्यामुळेच गुन्हेगारी घटना घडत आहेत. राज्यात कायद्याचा वचक असता तर गुन्हेगारी घटना घडल्या नसत्या. महिलांच्या सुरक्षिततेबाबत आपलं सरकार निरुत्साही आहे. महिलांच्या सुरक्षेतेकडे त्यांचं दुर्लक्ष होतंय असं मला वाटतंय. त्यामुळे महिलांच्या संरक्षणासाठी कडक कायदे करणे आवश्यक आहे. मला असं वाटतं की सरकारने लाडक्या बहिणींच्या सुरक्षिततेकडे देखील लक्ष देण्याची गरज आहे.” असा टोला रोहिणी खडसे यांनी महायुती सरकारला लगावला आहे.
मागील आठवड्यामध्ये रक्षा खडसे यांच्या मुलीची छेड काढली. या प्रकरणातील आरोपी अद्याप अटक करण्यात आलेली नाही. राज्यमंत्र्यांची मुलगी सुरक्षित नसेल तर इतर महिलांची काय व्यथा असेल अशी टीका करण्यात येत होती. या प्रकरणावरुन टीका करताना रोहिणी खडसे म्हणाल्या की, “त्या घटनेला १० दिवस उलटले आहेत. तरीदेखील या प्रकरणातील तीन आरोपी अद्याप फरार आहेत. या आरोपींना नेमकं कोणाचं पाठबळ आहे असा प्रश्न पडला आहे. त्यांच्यामागे नेमका कोण आका आहे ते शोधायला हवं. कोणाचं तरी त्यांना पाठबळ मिळतंय म्हणूनच ते इतके दिवस फरार राहू शकले.”
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
रोहिणी खडसे म्हणाल्या, “एका केंद्रीय मंत्र्याच्या घरातील मुली सुरक्षित नसतील तर महाराष्ट्रातील सामान्य माताभगिनींच्या सुरक्षिततेबद्दल काय बोलणार. इतकी मोठी घटना होऊनही आरोपी अद्याप फरार आहेत. त्यामुळे माझी मागणी आहे की सरकारने कायद्याचा वचक निर्माण करावा. माझी, तुमची किंवा कोणाचीही मुलगी असली तरी तिला संरक्षण मिळायलाच हवं आणि ती सरकारची जबाबदारी आहे.” असे मत रोहिणी खडसे यांनी व्यक्त केले आहे