खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे (फोटो - सोशल मीडिया)
मुंबई : आज सर्वत्र जागतिक महिला दिन साजरा केला जात आहे. दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून नारी शक्तीचा सन्मान करण्यासाठी खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यामध्ये देखील अनेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र महिला दिनाच्या निमित्ताने विरोधकांनी राज्यातील महिला सुरक्षावरुन प्रश्न उपस्थित केले आहेत. खासदार संजय राऊत यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मोदी सरकार आणि महायुती सरकारवर निशाणा साधला आहे.
खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, “आज जागतिक महिला दिन असल्यामुळे प्रधानमंत्री मोदींनी दिल्लीत महिलांसोबत एक कार्यक्रम ठेवला आहे. यामधून आम्ही कसे महिलांचे रक्षक आहोत, आम्ही कसं महिलांची काळजी घेतो अशा प्रकारचे कार्यक्रम करून महिला दिनाच्या निमित्ताने प्रसिद्धी दिली जाते. पण महाराष्ट्राची अवस्था पाहिली तर गेल्या काही महिन्यात महिलांवर होणारे अत्याचार हे देशात सर्वाधिक आहेत. मंत्री त्याच्यामध्ये सामील आहेत. सरकारी पक्षाचे लोक सामील आहेत. पोलिसांवर दबाव आणला जातो,” अशी घणाघाती टीका खासदार संजय राऊत यांनी केली आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे ते म्हणाले की,”लाडकी बहीण सारख्या योजनेच्या माध्यमातून पंधराशे रुपये तुम्हाला दिले म्हणजे महिला सुरक्षित आहेत आणि आम्ही महिलांचे हितरक्षक आहोत या भूमिकेत जर सरकार असेल तर सरकार समस्त महाराष्ट्राची आणि महिला वर्गाची फसवणूक करत आहे. लाडकी बहीण योजना हे सुद्धा किती फसवी आहे हे सुद्धा आपण निवडणुकीनंतर पाहिले. 2100 रुपये देणार होते लाडक्या बहिणींना निवडणुकीनंतर, ताबडतोब आता संबंधित खात्याच्या मंत्री बाई आहेत त्याही महिला जाहीर त्यांनी ते शक्य नाही सांगितलं ही महिलांची फसवणूक आहे,” असे स्पष्ट मत खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे.
महाराष्ट्रासंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
शिंदे आणि फडणवीस यांच्यात वॉर
उद्धव ठाकरे हे इतर नेत्यांचे निर्णय रद्द करतात अशी टीका मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली होती. यावरुन खासदार राऊत म्हणाले की, “त्यांना जे म्हणायचे आहे ते म्हणू द्या त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करू द्या त्यांना दुसरं कार्यक्रम नाही आहे. तुम्ही समोर पाहत आहात शिंदे आणि फडणवीस यांच्यात कसे वॉर युद्ध सुरू आहे. हे स्पष्ट दिसत आहे रोज दिसत आहे. अनेक निर्णय जय भ्रष्टाचारा संदर्भात होते ज्यांच्यावर भ्रष्टाचार सुरू होता असे निर्णय देवेंद्र फडणवीस थांबवले त्याबद्दल आम्ही त्यांचे स्वागत केले. अशाच निर्णयात उद्धव ठाकरे यांनी स्थगिती दिली असेच आधीच्या नगरविकास मंत्री यांचे किंवा अन्य मंत्री यांचे यातून भ्रष्टाचाराला चालना मिळेल दलाल चालना मिळेल ,आचार निर्णयाला उद्धव ठाकरे यांनी स्थगिती दिली त्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्या अभिनंदन केले पाहिजे. तुम्ही भ्रष्टाचार याला चालना देणारे खतपाणी घालणारे आधीच्या मुख्यमंत्री यांचे निर्णयात थांबवले आहेत हे महाराष्ट्राच्या हिताचे आहे म्हणून आम्ही त्यांचे अभिनंदन करतो आम्ही रडीचे डाव खेळत नाही,” असा टोला खासदार राऊत यांनी एकनाथ शिंदेंना लगावला आहे.