शिंदे-फडणवीसांमध्ये पुन्हा नव्या वादाची ठिणगी; नेमकं काय आहे कारण?
: गेल्या काही महिन्यापासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात अंतर्गत मतभेद सुरू असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. राज्याच्या नगरविकास खात्यात फडणवीस यांनी काही फेरबदल केल्यामुळे एकनाथ शिंदे नाराज होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा फडणवीसांनी घेतलेल्या निर्णयामुळे फडणवीस आणि शिंदेंमध्ये वादाची ठिणगी पडली आहे.
राज्यात महापालिकांमध्ये सनदी अधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांवरून देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांच्यात वाद निर्माण झाल्याचे वृत्त आहे. देवेंद्र फडणवीस यांनी ड वर्ग महापालिकांमध्येही आयएएस अधिकारी नियुक्त करण्याचा निर्णय घेतला. मात्र, नगरविकास विभागाने मुख्याधिकारी अथवा राज्यसेवेतील ज्येष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याची प्रचलित पद्धत कायम ठेवण्याचा आग्रह धरला आहे.
Bank Holiday Today: आज शनिवारी बँक खुल्या राहणार की बंद? RBI हॉलिडे लिस्ट वाचा
अ, ब, क वर्ग महापालिकांवर यापूर्वीच सनदी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. परंतु १९ ड वर्गाच्या महापालिकांवर परंपरेनुसार बिगर सनदी अधिकारी कार्यरत होते. आता या महापालिकांवरही सनदी अधिकारी नेमण्याचे आदेश फडणवीस यांनी दिल्याने नवा वाद निर्माण झाला आहे.त्यातच देवेंद्र फडणवीस यांनी साडेचार लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या आणि 900 कोटींचा अर्थसंकल्प असलेल्या महापालिकांमध्ये सनदी अधिकार नेमण्याच्या हालचाली सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, शिंदेंच्या जवळच्या काही अधिकाऱ्यांची ईडीकडून चौकशी झाल्यानंतर ते नाराज असल्याची चर्चाही सुरू आहे. नगरविकास विभागात फडणवीस यांचा थेट हस्तक्षेप होत असल्याने शिंदेंच्या नाराजीला अधिक उधाण आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
एकीकडे शिंदे फडणवीसांच्या नाराजी नाट्य सुरू असताना दुसरीकडे शिंदे गटातही अंतर्गत नाराजीचा सुर सुरू झाला आहे. मुंबई महापालिका निवडणुकांच्या तोंडावर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून विभाग प्रमुखांची नेमणूक केल्याने पक्षातील इतर इच्छुकांनी नाराजीचा सूर आळवला आहे. पश्चिम उपनगरा विभाग प्रमुखांच्या नियुक्तीवरून दक्षिण मुंबईतही आता उघड उघड विभागप्रमुखांच्या नियुक्तीला विरोध होऊ लागला आहे.शिवडी विधानसभभेच्या विभागप्रमुखपदी माजी नगरसेवक अंबोलेंच्या नियुक्तीवरून पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.
Asia Cup Points Table : आशिया कपच्या गुणतालिकेच उलथापालथ! संघाच्या रॅंकिंगमध्ये झाला मोठा बदल
शिवडीील पाच पैकी चार शाखाप्रमुख आणि इतर पदाधिकारी राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. पक्षात प्रवेश करतान जी आश्वासने पक्षाकडून देण्यात आली होती. ती पूर्ण होत नसल्याचा आरोप अनेकांकडून होताना दिसत आहे. तसेच आपल्यानंतर आलेल्यांना संधी मिळत असल्यानेही अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. नाना अंबोले यांच्या नियुक्तीला पदाधिकाऱ्यांनी उघड विरोध केला होत्. तयानंतर आता त्यांच्या विरोधात एकनाथ शिंदेंना पत्र दिले जाणार आहे. पण त्याचवेळी मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर एकनाथ शिंदे यांना ही नाराजी परवडणारी नसल्याचे बोलले जात आहे.