उपनेत्या सुषमा अंधारे यांनी कलंकित नेत्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे (फोटो - सोशल मीडिया)
पुणे : सत्ताधारी महायुतीमधील अनेक नेते हे सध्या चर्चेमध्ये आले आहेत. कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे विधीमंडळाच्या सभागृहामध्ये जंगली रमी खेळताना दिसून आले. तर शिंदे गटाचे नेते व आमदार संजय गायकवाड यांनी कॅन्टीन चालकाला मारहाण केली आहे. यावरुन राज्याचे राजकारण तापले आहे. या संदर्भात शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांनी राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची भेट घेतली आहे. यानंतर ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे.
सुषमा अंधारे यांनी माध्यमांशी संवाद साधून महायुतीवर जोरदार निशाणा साधला आहे. सुषमा अंधारे यांनी अनेक राजकीय विषयांवरुन महायुतीला घेरण्याचा प्रयत्न केला. त्या म्हणाल्या की, “राज्याच्या गृहराज्यमंत्र्यांच्या नावे जर डान्सबार असेल आणि तो डान्सबार आईच्या नावे चालवला जात असेल, ज्यावर आतापर्यंत तीनदा रेड पडलेली आहे, असा माणूस गृहमंत्रीपदावर कसा राहू शकेल. एकीकडे आर आर पाटील यांनी गृहमंत्री असताना डान्सबार बंद केले होते आणि आता हे नवे गृहराज्यमंत्री ज्यांच्या आईच्या नाव डान्सबार आहेत. तर अशा व्यक्तीला मंत्रिपदावर राहण्याचा अधिकार नाही, अशा शब्दांत सुषमा अंधारे यांनी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर निशाणा साधला.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे सुषमा अंधारे यांनी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा खरपूस समाचार घेतला. त्या म्हणाल्या की, “माणिकराव कोकाटेंसारख्या मंत्र्यांनी ज्या प्रकराची असंवेदनशील वक्तव्य केली, हे अत्यंत वाईट आहे. त्याबद्दलही चर्चा झाली आहे. अत्यंत बेशिस्त, बेताल आणि उर्मटपणे बोलणं असणारे संजय शिरसाट या मंत्र्यांचा पायउतार होणं गरजेचे आहे. याही मुद्द्यावर चर्चा झाली. योगेश कदम, संजय शिरसाट यांसह इतर लोकांशी संबंधित अनेक कागदपत्र आणि पुरावे त्यासोबतच पेन ड्राईव्हची फार मोठी फाईल अनिल परब यांनी राज्यपालांना दिली”, अशी माहिती शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी दिली आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
कलंकित मंत्र्यांच्या यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर कोण?
महाराष्ट्रातील कलंकीत मंत्र्यांचा राजीनामा घेण्याची मागणी ठाकरे गटाने केली आहे. याबाबत सुषमा अंधारे म्हणाल्या की, “या यादीत पहिल्या क्रमांकावर योगेश कदम, दुसऱ्या क्रमांकावर गिरीश महाजन, तिसऱ्या क्रमांकावर संजय शिरसाट, चौथ्या क्रमांकावर माणिकराव कोकाटे, पाचव्या क्रमांकावर संदीपान भूमरे आणि सहाव्या क्रमांकावर नितेश राणे यांचे नाव आहे. आम्ही या अनुक्रमाने यांच्या राजीनाम्याची थेट मागणी केली आहे,’ असे सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत.