वैभव सूर्यवंशी (फोटो- ians)
आयआयएम इंदोर करणार वैभव सूर्यवंशीवर अभ्यास
15 वर्षीय सूर्यवंशीची आयपीएलमध्ये शानदार कामगिरी
भारतीय व्यवस्थापन संस्था, इंदूर एक अग्रगण्य संस्था
Vaibhav Sooryvanshi in IPL 2026: आयपीएल 2026 चा हंगाम संपला आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध गुजरात टायटन्समध्ये या हंगामाचा अंतिम सामना पार पडला. आरसीबीने सलग दुसऱ्यांदा आयपीएल ट्रॉफीवर आपले नाव कोरले आहे. आयपीएल 2026 मध्ये वैभव सूर्यवंशीने शानदार कामगिरी केली आहे. संपूर्ण क्रिकेट विश्वाला त्याने चकित केले आहे. 15 वर्षीय वैभवने अनेक मोठे रेकॉर्डस आपल्या नावावर केले आहेत. दरम्यान आता जबरदस्त कामगिरी करणाऱ्या वैभव सूर्यवंशीवर IIM इंदूर अभ्यास करणार आहे.
IIM इंदोरने वैभव सूर्यवंशीच्या कामगिरीवर बहु-विषय केस स्टडी करण्याचा निर्णय घेतला आहे. खेळ, मानसशास्त्र आणि व्यवस्थापन क्षेत्रातील तज्ज्ञ एकत्र येऊन ‘वैभव मॉडेल’वर संशोधन करणार आहेत. वयाच्या 15 व्या वर्षी जगातील सर्वोत्तम गोलंदाजांचा सामना वैभव सूर्यवंशीने केला आहे. त्यामध्ये त्याचे मानसिक धैर्य आणि मैदानावरील दबाव हातळण्याचे कौशल्य दिसून येते. पूर्ण स्पर्धेत कामगिरीत सातत्य राखणे ही दिसून येते. वैभव सूर्यवंशीने यंदाच्या हंगामात अनेक वर्षांपासूनचे रेकॉर्ड मोडून काढले आहेत.
Vaibhav Sooryavanshi चे ‘पॉवर हिटिंग’ वर भन्नाट उत्तर
वैभव सूर्यवंशीने आयपीएल 2026 मध्ये स्फोटक फलंदाजी केली आहे. एलिमिनेटर आणि क्वालिफायर 2 मध्ये संघाला आवश्यक अशी महत्वपूर्ण खेळी त्याने केली आहे. त्याच्या ‘पॉवर हिटिंग’मुळे चाहत्यांमध्ये एक चर्चा रंगली होती की, तो ताकदीसाठी रोज किती लिटर दूध पीत असेल?
‘मी आता दूध पीत नाही तर…’; सिक्सर किंग Vaibhav Sooryavanshi चे ‘पॉवर हिटिंग’ वर भन्नाट उत्तर
अंतिम सामना झाल्यावर वैभव सूर्यवंशीला अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले. अंतिम सामन्यानंतर त्याला तू रोजी किती लीटर दूध पितोस असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर वैभव सूर्यवंशीने भन्नाट उत्तर दिले आहे. ‘मी आता दूध पीत नाही. तर मैदानात गोलंदाजांची धुलाई करतो. केवळ दूध पिऊन ताकद येत नाही, तर तासनतास केलेला सराव आणि मानसिक खंबीरता यामुळेच मोठे फटके खेळू शकतो’, असे उत्तर वैभव सूर्यवंशीने दिले आहे.
आयपीएल 2026 चा हंगाम नुकताच पार पडला. आयपीएल 2026 चे विजेतेपद रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने पटकावले आहे. आरसीबीने सलग दुसऱ्यांदा आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे. तर ऑरेंज कॅपचा मानकरी वैभव सूर्यवंशी ठरला आहे. सध्या सर्वत्र त्याच्या कामगिरीची चर्चा सुरू आहे. लवकरच तो भारतीय संघात खेळण्याची शक्यता आहे. बीसीसीआयने तसे संकेत दिले आहेत.
नशीब असावे तर असे! Vaibhav Suryavanshi टीम इंडियाकडून खेळणार? BCCI ने दिले ‘हे’ संकेत
वैभव सूर्यवंशीने आयपीएल 2026 मध्ये आपल्या कामगिरीने सर्वांना चकित केले आहे. एकाच आयपीएल हंगामात वैभव सूर्यवंशीने सर्वाधिक सिक्सर मारण्याचा विक्रम केला आहे. तसेच वेगवान शतक आणि आणि वेगवान 1000 रन्स पूर्ण करण्याचा रेकॉर्ड त्याने त्याच्या नावावर केला आहे. त्यामुळे वैभवसाठी टीम इंडियाची दारे खुली होणार का अशी चर्चा सुरू झाली आहे. आता याबाबत बीसीसीआयने तसे संकेत दिले आहेत.






