(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Peddi Song Release: वर्षभरातील सर्वात मोठ्या पॅन-इंडिया चित्रपटांपैकी एक असलेल्या #Peddi चा बहुप्रतिक्षित ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटातून राम चरण आणि जान्हवी कपूर ही फ्रेश जोडी मोठ्या पडद्यावर जादू निर्माण करण्यासाठी सज्ज झाली आहे. विविध खेळांच्या पार्श्वभूमीवर विणलेल्या या कथेत ग्रामीण मैदानांपासून आंतरराष्ट्रीय स्पर्धांपर्यंतचा रोमांचक प्रवास दाखवण्यात आला आहे, जो प्रेक्षकांना सुरुवातीपासून शेवटपर्यंत खिळवून ठेवतो.
Milk Price Hike : पेट्रोल-डिझेल पाठोपाठ आता दुधही महागलं? दही, पनीरसह वाढल्या इतक्या किमती
एका बाजूला ट्रेलरने देशभरात धुमाकूळ घातला असताना, आता मेकर्सनी चित्रपटातील आणखी एक नवे गाणे ‘हेल्लाल्लालो’ (Hellallallo) रिलीज केले आहे. या गाण्यातील जबरदस्त आणि भन्नाट ऊर्जा संपूर्ण देशाला ठेका धरायला भाग पाडणारी आहे. सोशल मीडियावर #Peddi चे नवे गाणे ‘हेल्लाल्लालो’ रिलीज करताना मेकर्सनी एक भन्नाट कॅप्शन शेअर केले: “आता ‘हॅलो’ला म्हणा गुडबाय, कारण आता सर्वत्र घुमणार फक्त #Hellallallo #Hellallallo व्हिडिओ सॉंग आऊट” म्हणत त्यांनी लिंक शेअर केली आहे. #PEDDI चित्रपट 4 जून रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये धडक देण्यासाठी सज्ज आहे.
भोपालमध्ये 23 मे रोजी ‘पेद्दी’साठी आतापर्यंतचा सर्वात मोठा म्युझिकल इव्हेंट आयोजित करण्यात आला होता. या भव्य कार्यक्रमात चित्रपटाची संपूर्ण स्टारकास्ट सहभागी झाली होती. यात राम चरण, जान्हवी कपूर, रवी किशन, शिवा राजकुमार, दिव्येंदू शर्मा आणि जगपती बाबू यांच्यासह दिग्दर्शक बुची बाबू सना आणि दिग्गज संगीतकार ए. आर. रहमान यांची उपस्थिती विशेष ठरली. गाणी, पोस्टर्स, टीझर आणि ट्रेलरला मिळालेल्या जबरदस्त प्रतिसादानंतर आता हे नवे गाणेही चित्रपटाचा आणखी एक ब्लॉकबस्टर अॅसेट ठरत असून, रिलीजबाबत चाहत्यांची उत्सुकता दुपटीने वाढवणारे ठरले आहे.
राम चरण ‘पेद्दी’मध्ये एका ‘क्रॉसओव्हर अॅथलीट’च्या भूमिकेत दिसणार आहेत. जसे एम. एस. धोनी क्रिकेटर होण्यापूर्वी फुटबॉलपटू होते, आणि सचिन तेंडुलकर क्रिकेटचा देव होण्यापूर्वी टेनिसमध्ये रस घेत होते, तसेच आपल्या देशातील अनेक मोठ्या क्रीडा आयकॉन्सचा प्रवासही अशाच रंजक क्रॉसओव्हरमधून झाला आहे.
बुची बाबू सना लिखित आणि दिग्दर्शित ‘पेद्दी’मध्ये राम चरण मुख्य भूमिकेत असून, त्यांच्यासोबत शिवा राजकुमार, जान्हवी कपूर, दिव्येंदू शर्मा आणि जगपती बाबू यांसारखे दमदार कलाकार झळकणार आहेत. या चित्रपटाची निर्मिती वृद्धि सिनेमाजच्या बॅनरखाली वेंकट सतीश किलारू करत आहेत. मायथ्री मूव्ही मेकर्स, सुकुमार रायटिंग्स आणि IVY एंटरटेनमेंट यांचे विशेष सहकार्य असून, ईशान सक्सेना सह-निर्माता आहेत.
चित्रपटामागे एक अत्यंत मजबूत आणि प्रतिभावान तांत्रिक टीमदेखील उभी आहे. यात ऑस्कर विजेते ए. आर. रहमान यांचे संगीत, आर. रथनावेलू यांची सिनेमॅटोग्राफी, अविनाश कोल्ला यांचे प्रॉडक्शन डिझाइन, नवीन नूली यांचे एडिटिंग आणि व्ही. वाय. प्रविण कुमार यांचे एक्झिक्युटिव्ह प्रोडक्शन यांचा समावेश आहे, जे या चित्रपटाच्या सिनेमॅटिक भव्यतेला अधिक बळकटी देतात.
‘धुरंधर’, ‘धुरंधर द रिव्हेंज’ आणि ‘राजा शिवाजी’ यांच्या भव्य यशानंतर ‘पेद्दी’ उत्तर भारतात जिओ स्टुडिओजद्वारे प्रदर्शित केला जाणार आहे. हा चित्रपट 3 जून 2026 रोजी जगभरात प्रीमियर होईल आणि त्यानंतर 4 जून 2026 रोजी जागतिक स्तरावर थिएटर्समध्ये प्रदर्शित केला जाईल.






