रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराज समाधी शेजारी असणाऱ्या वाघ्या कुत्रा समाधीवरुन वाद (फोटो - सोशल मीडिया)
रायगड : राज्यामध्ये इतिहासातील काही समाधी आणि कबरीवरुन आता वातावरण तापले आहे. औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा ऐरणीवर असताना वाघ्या कुत्र्याच्या समाधीचा मुद्दा समोर आला आहे. रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीजवळच वाघ्या कुत्र्याची समाधी आहे. या समाधीला कोणताही ऐतिहासिक पार्श्वभूमीवर नसून अगदी काही वर्षापूर्वी बांधण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी शेजारी अशा पद्धतीची कुत्र्याची समाधी असणे यावर आक्षेप घेतला जात आहे. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना संभाजीराजे छत्रपती यांनी पत्र लिहिले आहे.
संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. यामध्ये त्यांनी लिहिले आहे की, हिंदवी स्वराज्याची राजधानी दुर्गराज रायगड येथे श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीलगत कथित वाघ्या कुत्र्याची समाधी म्हणून एक संरचना काही दशकांपूर्वी उभारण्यात आलेली आहे. सदर वाघ्या कुत्रा नामक पात्राचा शिवकालीन इतिहासात कोणत्याही प्रकारचा उल्लेख अथवा संदर्भ मिळत नाही.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
भारतीय पुरातत्व विभागाने देखील सदर समाधी संरचना व वाघ्या कुत्र्याचे ऐतिहासिक महत्त्व यांबाबत त्यांच्याकडे कोणतीही ऐतिहासिक माहिती व पुरावे उपलब्ध नसल्याची स्पष्टोक्ती दिलेली आहे.
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) March 24, 2025
समस्त भारतवासीयांचे श्रद्धास्थान असणाऱ्या श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीलगत एका कपोलकल्पित कुत्र्याची समाधी व पुतळा उभारणे हे महाराष्ट्राचे दुर्दैव, श्रद्धेची कुचेष्टा व महान युगप्रवर्तक श्री छत्रपती शिवाजी महाराजांची घोर प्रतारणा आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे लिहिले आहे की, “कोणतीही ऐतिहासिक पार्श्वभूमी व महत्त्व नसलेली सदरील वाघ्या कुत्रा समाधी नामक संरचना हे दुर्गराज रायगडवरील अतिक्रमण असून राज्य शासनाच्या धोरणानुसार दि. ३१ मे २०२५ अखेरीपर्यंत सदरील अतिक्रमण श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीस्थळावरून व दुर्गराज रायगड वरून कायमस्वरूपी हटविण्यात यावे, याकरिता मुख्यमंत्री महोदयांकडे पत्र लिहून मागणी केली…”
“भारतीय पुरातत्व विभागाच्या धोरणानुसार १०० वर्षांहून अधिक पुरातन असलेली संरचना संरक्षित स्मारक म्हणून गणली जाते. त्यामुळे वाघ्या कुत्रा समाधी संरचनेस १०० वर्षे पूर्ण होण्यापूर्वीच विहित कालमर्यादेत ही संरचना हटविणे अत्यावश्यक आहे,” असे पत्र संभाजीराजे छत्रपती यांनी लिहिले आहे.
राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन हे औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्द्यावरुन जास्त गाजले आहे. यामध्ये अबू आझमी यांनी औरंगजेबाचे उदात्तीकरण करणारे वक्तव्य केले होते. यानंतर महाराष्ट्रातील औरंगजेबाची कबर ही उखडून टाकावी अशी मागणी केली जात आहे. ही मागणी सत्ताधारी नेत्यांसह विरोधी नेते देखील करत आहेत. तर दुसरीकडे औरंगजेबाच्या कबरीच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली आहे. यानंतर आता रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या समाधीचा विषय समोर आला आहे.