बुधादित्य योगामुळे मिळणार कोणत्या राशींना फायदा (फोटो सौजन्य - iStock/Freepik)
ज्योतिषशास्त्रात बुधादित्य योग खूप शुभ मानला जातो. बुधादित्य राजयोग संपत्ती, यश, बुद्धिमत्ता आणि लोकप्रियता देतो. लवकरच वृषभ राशीत बुधादित्य योग तयार होत आहे जो ५ राशीच्या लोकांना भरपूर लाभ देईल. ज्योतिषाचार्य समीर मणेरीकर यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे.
सूर्य वृषभ राशीत भ्रमण करत आहे आणि आता २३ मे रोजी बुध वृषभ राशीत भ्रमण करत आहे. वृषभ राशीत बुध आणि सूर्याची युती असेल. सूर्य आणि बुध यांच्या युतीमुळे बुधादित्य राजयोग निर्माण होतो, जो खूप शुभ आणि फलदायी असतो. वृषभ ग्रहाचा स्वामी शुक्र आहे आणि तो बुध ग्रहाचा मित्र आहे. म्हणून, बुध ग्रहाचे हे संक्रमण अनेक प्रकारे खूप शुभ परिणाम देणार आहे. हा योग पदोन्नती, संपत्ती, यश आणि कीर्ती देईल. जाणून घ्या या भाग्यवान राशी कोणत्या आहेत (फोटो सौजन्य – iStock/Freepik)
मेष रास
मेष राशीला नक्की काय फायदा मिळणार
मेष राशीच्या लोकांना बुधादित्य योगाचा फायदा होईल. कौटुंबिक प्रश्न आता या योगामुळे मार्गी लागतील. तुम्ही सामाजिकदृष्ट्या खूप सक्रिय असाल असाही अंदाज यावेळी ज्योतिषांनी वर्तविला आहे. तुम्हाला पैसे कमविण्याच्या नवीन संधी मिळतील. याशिवाय तुमचे प्रलंबित पैसे येणे असतील तर तेदेखील मिळतील. विशेषतः व्यापारी वर्गाला याचा फायदा होईल. त्यामुळे मेष राशीच्या व्यक्तींसाठी हा योग्य अत्यंत महत्त्वाचा आहे.
Rahu Mangal: भयंकर षडाष्टक योग, होणार युद्ध येणार तुफान; जगावर पडणार भारी 7 जूनपर्यंत येणार काळरात्र
कर्क रास
कर्क राशीला मिळणार फायदा
बुध आणि बुधादित्य राजयोगाचे भ्रमण कर्क राशीच्या लोकांना लाभदायक ठरेल. तुम्ही सकारात्मक आणि सर्जनशील असाल. या काळात तुम्ही पूर्ण उत्साह आणि उर्जेने काम कराल आणि यशस्वीही व्हाल. लग्न करू इच्छिणाऱ्यांची इच्छा पूर्ण होऊ शकते. कर्क राशींच्या व्यक्तींसाठी हा काळ अत्यंत शुभ असेल असे सांगण्यात आले आहे. तुम्हाला या काळात काही गुंतवणूक करायची असेल तरीही हा काळ नक्कीच लाभदायक आहे.
कन्या रास
कन्या राशीच्या व्यक्तीची होणार भरभराट
कन्या राशीच्या लोकांचे नाते अधिक दृढ होईल. प्रेम जीवन चांगले राहील आणि या काळात कन्या राशीच्या व्यक्तींना प्रेमात यश मिळण्याच्या संधी अधिक आहेत. तुम्ही एखाद्यावर प्रेम करत असाल तर आपले प्रेम नक्की व्यक्त करा. शिक्षण आणि कायद्याच्या क्षेत्राशी संबंधित लोकांना विशेष लाभ मिळू शकतात. तुम्ही तुमच्या कारकिर्दीत मोठे यश मिळवू शकता आणि तुम्हाला प्रसिद्धीदेखील या काळात मिळेल
Astrology: संध्याकाळी घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ दिवा लावताना पाळा ‘हे’ नियम
कुंभ रास
बुधादित्य योगाचा कुंभ राशीवर होणारा परिणाम
बुधाच्या भ्रमणामुळे कुंभ राशीच्या लोकांना खूप फायदा होईल. व्यवसायात कठोर परिश्रमाचे फळ प्रचंड नफा आणि मोठ्या ऑर्डरच्या स्वरूपात मिळेल. तुमचा व्यवसाय नवीन उंची गाठेल. तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या. आतापर्यंत तुम्ही अनेक खस्ता खाल्ल्या असतील पण आता तुमच्या नशीबात चांगले फळ मिळणार आहे. हा बुधादित्य योग तुमचे नशीब पालणटणार असून तुमच्या आयुष्यात आनंद मिळणार आहे.
मीन रास
मीन राशीला होणारा फायदा
बुध संक्रमणामुळे निर्माण होणारा बुधादित्य राजयोग मीन राशीच्या लोकांना आरोग्याशी संबंधित समस्यांपासून मुक्ती देईल. तुम्ही तुमचे करिअर बदलू शकता आणि करिअरमध्ये तुम्हाला चांगला फायदा मिळू शकतो. याशिवाय तुम्ही आपल्या मित्रमैत्रिणींसह दूर सहलीला जाऊ शकता. तुमच्या कामाचे या काळात सर्व स्तरावर कौतुक होईल आणि यामुळे तुम्हाला प्रसिद्धीही मिळेल.
टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.