ज्योतिषशास्त्रानुसार असं म्हटलं जातं की, राहू हा छाया ग्रह आहे. जो प्रत्येक गोष्टी भास निर्माण करतो. राहु माणसाच्या मानसिकतेवर जास्त परिणाम करतो. पत्रिकेत राहुची दशा कोणती आहे त्यानुसार त्याची चांगली वाईट फलितं मिळतात. राहुचा प्रभाव गूढ, अचानक घडणाऱ्या घटना आणि मानसिक चंचलता यांच्याशी जोडला जातो. त्यामुळे अनेकांना वाटतं की “राहूदोष असेल तर आयुष्यात फक्त वाईटच घडतं”. पण प्रत्यक्षात हे अर्धवट सत्य आहे. राहूदोष हा भयभीत करणारा दोष नसून, व्यक्तीच्या जीवनातील काही विशिष्ट क्षेत्रांमध्ये अस्थिरता किंवा अनपेक्षितता वाढवतो, पण प्रत्येक परिणाम नकारात्मकच असेल असं नाही.
खरं पाहिलं तर राहुला कलियुगाचा राजा म्हणतात. त्याची जशी नकारात्म बाजू आहे तशी चांगली देखील आहे. राहु केतू किंवा शनी देखील पापी ग्रह मानवी जीवनाला धडा शिकवण्यासाठी असतात असं ज्योतिषशास्त्र सांगतं. राहुचा प्रभाव एखाद्याच्या विचारशक्तीला वेग, नवीन गोष्टींचं कुतुहल किंवा त्या करुन पाहण्याची इच्छा निर्माण करतो. जर एखादं काम करण्याबाबत आत्मविश्वास नसेल तर राहु तुम्हाला तुमची क्षमता ओळखण्यास मदत करतो तसंच अतिआत्मविश्वास किती घातकी आहे हे देखील दाखवून देतो.
अनेक यशस्वी लोकांच्या कुंडलीत राहूची मजबूत स्थिती दिसते. याचा परिणाम म्हणजे इतरांपेक्षा वेगळा विचार करण्य़ाची शक्ती, जोखीम घेण्याची वृत्ती ही त्यांना त्यांच्या करियरमध्ये वेगळ्याच उंचीला जाण्यास मदत करते. . म्हणजेच राहू फक्त नुकसान करतो हा गैरसमज आहे हे यातून कळतं.
राहूदोषाचे परिणाम मुख्यतः व्यक्तीच्या ग्रहस्थितीवर, त्याच्या महादशा-अंतर्दशेवर आणि कुंडलीतील इतर ग्रहांशी असलेल्या संबंधांवर अवलंबून असतात. काही वेळा राहू मानसिक अस्वस्थता, निर्णयात भ्रम, अनाठायी भीती, आर्थिक चढउतार किंवा नात्यांमध्ये गैरसमज निर्माण करू शकतो. पण योग्य उपाय, शांती आणि अध्यात्मिक संतुलनामुळे हे परिणाम कमी करता येतात.
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे—राहूदोष हा कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्याचा निकाल ठरवत नाही. तो प्रवासात अडथळे निर्माण करू शकतो, पण त्याच वेळी शिकण्याची, मजबूत होण्याची आणि परिस्थितीवर मात करण्याची ऊर्जा देखील देतो. त्यामुळे राहूविषयीची भीती बाजूला ठेवून, शांत मनाने त्याचे प्रभाव समजून घेणे गरजेचं आहे. योग्य मार्गदर्शन, उपाय आणि सकारात्मकता असेल तर राहूदोषावर सहज मात करता येते आणि जीवनात प्रगतीही साधता येते. राहुचा नकारात्मक प्रभाव दूर करण्यासाठी “ॐ रां राहवे नमः” या मंत्राचा जप किंवा भगवान विष्णूंची उपासना तुम्ही करु शकता.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: राहू हा छाया ग्रह मानला जातो. कुंडलीत तो प्रत्यक्ष शरीररहित ऊर्जा दर्शवतो. राहूदोष म्हणजे कुंडलीतील राहूची अशुभ स्थिती, जी काही क्षेत्रांत अस्थिरता, भ्रम किंवा मानसिक तणाव निर्माण करू शकते.
Ans: नाही. हा एक गैरसमज आहे. राहूदोषामुळे काही चढउतार, गोंधळ किंवा अचानक घटना घडू शकतात, पण त्याच्यासोबत सकारात्मक परिणामही मिळू शकतात. काही लोकांना राहूमुळे वेगळा दृष्टिकोन, धाडस आणि मोठ्या संधी मिळतात.
Ans: नाही. राहूची नकारात्मक बाजू जशी आहे, तशी त्याची चांगली बाजूदेखील आहे. तो विचारशक्तीला वेग, नवीन कल्पनांची ओढ, कुतूहल आणि सुधारण्याची प्रेरणा देतो.






