फोटो सौजन्य- pinterest
बुधवार, २७ मेचा दिवस ज्योतिषशास्त्रीयदृष्ट्या अत्यंत शुभ आणि फाये मानला जातो. ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या एकादशीला एक विशेष ग्रहस्थिती जुळून येत आहे, ज्यामुळे अनेक राशींना देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळू शकतो. हस्त नक्षत्रासोबतच व्यतिपात योग, सर्वार्थ सिद्धी योग आणि रवी योग यांसारखे शुभ योग तयार होणार आहे त्यामुळे यश, आर्थिक लाभ आणि शुभ कार्यांसाठी अनुकूल मानले जातात. चंद्र दिवसरात्र कन्या राशीत राहून संध्याकाळी तूळ राशीत प्रवेश करणार आहे. यामुळे काही राशींच्या जीवनात सकारात्मक बदल होताना दिसून येतील आणि आनंदाची बातमी देखील ऐकायला मिळू शकते. पद्मिनी एकादशीच्या दिवशी कोणत्या राशींच्या लोकांना फायदा होणार आहे जाणून घ्या
कर्क राशीच्या लोकांना पद्मिनी एकादशीचा दिवस नवीन संधी आणि सकारात्मक बदलांनी भरलेला असू शकतो. तुम्ही तुमच्या बुद्धीचा आणि विवेकबुद्धीचा वापर करून नवीन उपक्रम सुरू कराल, जे यशस्वी होण्याची दाट शक्यता आहे. कुटुंब आणि मित्रांकडून मिळणाऱ्या पाठिंब्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. कौटुंबिक वादही निवळण्याची शक्यता आहे आणि संध्याकाळ समाजकार्यात किंवा एखाद्या शांततापूर्ण उपक्रमात घालवता येईल.
तूळ राशीच्या लोकांसाठी हा दिवस व्यवसाय आणि सामाजिक जीवनात प्रगती घेऊन येईल. चांगला नफा मिळण्याची शक्यता असून, कौटुंबिक सन्मान वाढेल. काही चांगल्या बातमीमुळे घरात आनंदी वातावरण निर्माण होईल. नोकरी करणाऱ्यांना आराम आणि समाधान मिळू शकेल. समाजकार्यातील तुमचा सक्रिय सहभाग लोकांमध्ये तुमची प्रतिमा अधिक मजबूत करेल.
वृश्चिक राशीच्या लोकांना पद्मिनी एकादशीच्या दिवशी नवीन व्यवसायाची सुरुवात करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे आणि नशीब त्यांच्या बाजूने असेल. त्यांच्या मुलांकडून येणारी चांगली बातमी आनंद घेऊन येईल. शिक्षण आणि करिअरमध्येही प्रगतीचे संकेत आहेत. कौटुंबिक पाठिंब्यामुळे अनेक समस्या सोडवण्यास मदत होऊ शकते आणि संध्याकाळी तुम्हाला एखाद्या धार्मिक किंवा सामाजिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळू शकते.
कुंभ राशीच्या लोकांना कामाच्या ठिकाणी आदर आणि कौतुक मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या मेहनतीचे आणि कार्यनिष्ठेचे कौतुक होईल. नवीन व्यावसायिक योजना फायदेशीर ठरतील आणि दीर्घकाळच्या समस्या दूर होऊ शकतील. कौटुंबिक संबंध सुधारतील आणि तुमच्या वडिलांसोबतचे नाते अधिक सलोख्याचे होईल. तुम्ही मित्र आणि प्रियजनांसोबत संध्याकाळचा आनंद घ्याल.
मीन राशीसाठी हा दिवस आर्थिक आणि व्यावसायिक अशा दोन्ही बाबतीत अत्यंत शुभ ठरू शकतो. व्यवसाय आणि नोकरीमध्ये यश मिळण्याची दाट शक्यता आहे. जुनी कर्जे फेडली जाण्याची शक्यता असून, तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल. कुटुंबात आनंदी वातावरण राहील आणि पाहुण्यांच्या आगमनाने ते अधिकच उल्हासित होऊ शकते. तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि रखडलेली कामे पुढे सरकतील.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: ज्योतिषशास्त्रानुसार सर्वार्थ सिद्धी योग हा अत्यंत शुभ योग मानला जातो. या योगात केलेली शुभ कार्ये यशस्वी होतात अशी श्रद्धा आहे.
Ans: ही एकादशी भगवान विष्णूंना समर्पित मानली जाते. या दिवशी उपवास, पूजा आणि मंत्रजप केल्याने पुण्य प्राप्त होते असे मानले जाते.
Ans: पद्मिनी एकादशीच्या दिवशी कर्क, तूळ, वृश्चिक, कुंभ आणि मीन राशींच्या लोकांना फायदा होणार






