स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांची पुण्यतिथी; जाणून घ्या २७ मे चा इतिहास (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
आज, २७ मे, स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांची पुण्यतिथी आहे. त्यांना आधुनिक भारताचे शिल्पकार म्हणूनही ओळखले जाते.डोक्यावर टोपी आणि जॅकेटवर गुलाबा असा त्यांचा पोषाखाची ओळख असायची. त्यांचा जन्म १४ नोव्हेंबर १८८९ मध्ये अलाहाबाद येथील काश्मीरी ब्राह्मण कुटुंबात झाला होता. त्यांनी आपले प्राथमिक शिक्षण भारतात पूर्ण केले आणि नंतर इंग्लंडला जाऊन उच्च पदवी घेतली. यानंतर १९१२ मध्ये भारतता परतल्यावर त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यांनी समाजवादी समाजरचेच्या विचारसरणीला नेहमीत प्राधान्य दिले. नेहरुंना मुले खूप आवडायची यामुळे त्यांचा जन्मदिवस १४ नोव्हेंबर हा बालदिन म्हणून साजरा केला जातो. अशा या महान नेत्याचे २७ मे १९६४ मध्ये निधन झाले.
27 मे रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना
27 मे रोजी जन्म दिनविशेष (Dinvishesh)






